भुसावळ – महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यामधून उत्तराखंड राज्या मध्ये जाणा-या रेल्वे प्रवाशांना RT-PCR Negative तपासणी रिपोर्ट अनिवार्य असणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाने दिली आहे.
भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्य प्रदेश राज्यमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना उत्तराखंड राज्य मध्ये पोहोचण्याआधी ७२ तास आधी कोविड ची RT-PCR Negative तपासणी करून रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे.याची नोंद संबंधित प्रवाशांनी याची घ्यावी आणि गैरसोय टाळावी असेही भुसावळ विभागाने म्हटले आहे.