डेहरादून – चार दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर अखेर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तीरथसिंग रावत यांची वर्णी लावण्यात आली आहे. ते पौडा गढवाल येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते आता खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा आज दुपारी ४ वाजता होणार आहे. तशी घोषणा भाजपचे उत्तराखंड प्रभारी दुष्यंत कुमार आणि निरीक्षक रमणसिंह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मंगळवारी सायंकाळी राजभवनात राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे सोपवला होता. राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांकडून पदभार स्वीकारेपर्यंत कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून ते पदावर राहतील, असे राज्यपालांनी सांगितले.
नव्या नेत्याच्या निवडीसाठी भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक नुकतीच झाली आहे. केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह उत्तराखंडचे मुख्य प्रभारी दुष्यंत कुमार हे उपस्थित होते. उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदलाबाबत शनिवारपासून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णविराम लागला आहे.
https://twitter.com/ANI/status/1369526459849576449