नवी दिल्ली ः प्रसिद्ध फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामनं Live Rooms नावाचं नवं फिचर लॉन्च केलं आहे. या फिचरमध्ये युजर आपल्यासह इतर तीन युजर्सना एकसाथ लाईव्हमध्ये सहभागी करून घेऊ शकतो. म्हणजेच एका लाईव्ह व्हिडिओमध्ये एकसाथ चार युजर्स इन्स्टाग्राममध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनीचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सांगितलं, की या फिचरची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. हे फिचर भारतीय युजर्ससाठी जारी करण्यात आलं आहे.
सध्या केवळ एकच व्यक्तीला जोडणे शक्य
इन्स्टाग्रामवर लाईव्ह येण्याची सुविधा अनेक दिवसांपासून मिळत आहे. तुम्ही फोन कॅमेर्यातून लाईव्ह करून तुमच्या फॉलोअर्सशी लाईव्ह चॅट करू शकतात. सोबतच कोणत्याही एका मित्राला लाईव्ह जोडू शकतात.
आता कंपनीचं म्हणणं आहे की, तुम्ही एकाच ब्रॉडकास्टमध्ये आणखी तीन जणांना जोडू शकतात. ऑक्टोबकमध्ये इन्स्टाग्रामनं लाईव्ह स्ट्रीमवर चार तासांपर्यंतची मुदत वाढवली होती.
इन्स्टाग्रामनं नव्या लाईव्ह रूम्स फिचरची टेस्ट सर्वात प्रथम भारत आणि इंडोनेशियामध्ये केली होती. नव्या फिचरमुळे युजर्सना लाईव्ह म्युजिक इव्हेंट, दुसर्या क्रिएटर्सशी जोडलं जाणं तसंच एकाहून अधिक सेलेब्रिटींशी चर्चा करण्यासारखी कामं करणं सोपं ठरणार आहे.
सुरक्षेवरही विशेष लक्ष देण्यात आलं असून, लाईव्ह रूम या फिचरच्या सुरक्षेचाही त्यात समावेश आहे. कम्युनिटीला सुरक्षित ठेवण्यासाठी यामध्ये इन बिल्ट कंट्रोल दिले गेले आहे.
लाईव्ह रूम फिचरचा वापर कसा कराल
१) सर्वात प्रथम इन्स्टाग्राम अॅप ओपन करा आणि राईट स्वाईप करा.
२) इन्स्टाग्राम कॅमेरा उघडेल आता लाईव्हचा पर्याय निवडा
३) डाव्या बाजूला दिल्या गेलेल्या मेन्यूचा वापर करून टायटल लिहा. टायटलशिवायही तुम्ही लाईव्हला जाऊ शकता.
४) आता लाईव्ह जाण्यासाठी गोल बटन टॅप करावा
५) कोणत्याही गेस्टला जोडण्यासाठी कॅमेरा आयकॉनवर टॅप करा
६) ज्या लोकांनी लाईव्ह जोडण्याची रिक्वेस्ट केली आहे, त्या लोकांना तुम्ही निवडू शकता.
७) आता गेस्टच्या हँडलवर टॅप करा जेणेकरून ते लाईव्ह रूमला जोडले जातील.