जकार्ता (इंडोनेशिया) – येथील विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या ४ ते ५ मिनिटातच प्रवासी विमान अचानक गायब झाले आहे. या विमानात ६२ प्रवासी आहेत. त्यामुळे या विमानाचे शोधकार्य युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. श्री विजय एअरवेजचे हे विमान आहे. ते जकार्ताहून पोन्टानैकला जात होते. अवघअया २५० फुटांवरुनच ते गायब झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने विविध पातळ्यांवर शोधकार्य सुरू केले आहे. हे विमान समुद्रात कोसळले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/flightradar24/status/1347865210317627392