नवी दिल्ली – इस्रोमध्ये नोकरी करणं हे अनेकांच स्वप्न असतं. यात तुम्हीही आहात का? तर मग ही संधी तुमच्यासाठीच आहे. इस्रोने लवकरच भरती होणार आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अकाऊंट्स ऑफिसर यांसह अन्य पदांसाठी जाहिरात काढली आहे. एकूण २४ पदांसाठी भरती होणार असून यासाठी तुम्ही २१ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.
१ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून २१ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. तर शुल्क भरण्यासाठी २३ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. यासाठी इस्रोच्या https://www.isro.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज मिळवता येईल.
कोणत्या पदांसाठी आहे भरती
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – ६ पदे
अकाऊंट्स ऑफिसर – ६ पदे
पर्चेस ऍण्ड स्टोअर्स ऑफिसर – १२ पदे
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी एमबीएची पदवी असणे आवश्यक असून त्याशिवाय सुपरवाझरपदाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर पदव्युत्तर शिक्षणासह ३ वर्षांचा अनुभव किंवा पदवी शिक्षणासह ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अकाऊंट्स ऑफिसरसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सीए, एफसीए, आयसीडब्ल्यूए, एफआयसीडब्ल्यूआयए, एमबीए किंवा एमकॉमचे शिक्षण तसेच अनुभवाची आवश्यकता आहे. याशिवाय बी.कॉम, बीबीए, बीबीएम पदवीही चालेल. पण २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
तर पर्चेस ऍण्ड स्टोअर्स ऑफिसरसाठी मटेरिअल मॅनेजमेंटमध्ये एमबीए आणि सुपरवाझरसाठी १ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.