नवी दिल्ली – येथील इस्त्रायली दूतावासाजवळ आयईडी स्फोटानंतर जगातील सर्वात प्राणघातक गुप्तचर संस्था असलेली मोसाद पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संघटना १ डिसेंबर १९४९ रोजी स्थापन करण्यात आली आहे.
शत्रूंना मारण्यासाठी कार बॉम्ब, लेटर बॉम्ब आणि मोबाईल बॉम्बचा ही संघटना वापर करते. दिल्लीत झालेला स्फोट हा दहशतवादी कृत्य असल्याचे इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आपले अधिकारी भारताशी सतत संपर्कात असल्याचे इस्त्राइलने स्पष्ट केले आहे. आज आपण जाणून घेऊ या इस्त्राइलच्या मोसाद या गुप्तरच संघटनेविषयी..
- २०१२ मध्ये दिल्लीतील ज्यू दूतावासाजवळ त्यांनी बॉम्बस्फोटही झाला होता. इराणशी मोसादचे जुने वैर आहे. कारण २०१२ मध्ये इराणने आपल्या अणुविज्ञान वैज्ञानिक मसूद अली मोहम्मदीच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या एका इस्रायली जासूसला फाशी दिली होती.
- १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्त्रायली संघाच्या ११ खेळाडूंच्या मारेकऱ्यांचा शोध मोसादने घेतला. मोसादच्या यादीमध्ये ११ दहशतवादी होते. जे वेगवेगळ्या देशांमध्ये गेले आणि म्युनिकमध्ये इस्रायली खेळाडूंच्या हत्येनंतर लपले. परंतु मोसदने २० वर्षांच्या कारवाईत सर्व दहशतवाद्यांचा शोध लावला आणि त्यांचा खात्मा केला.
- अण्वस्त्र अभियानाच्या गुपितेशी संबंधित फाइल्स चोरण्यासाठी मोसदने रात्रीच्या अंधारात आपला शत्रू देश इराणची राजधानी तेहरानच्या गोदामातही प्रवेश केला होता. मोसादची ही धोकादायक कारवाई २०१८ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालातून उघडकीस आली होती.
- मोसादने पॅलेस्टाईन नेते यासर अराफातचा उजवा हात असलेला खलील अल वजीर याला आणि त्याच्या कुटुंबातील ६० हून अधिक लोकांना गोळ्या घातल्या. खलील हा अबू जिहाद म्हणूनही ओळखले जात असे. ही कारवाई मोसादच्या दोन डझनहून अधिक एजंटांनी केली होती.
- एकेकाळी मिग २१ या रशियन विमानाचा मोठा धसका अनेकांनी घेतला होता. अमेरिकेला १९६० च्या दशकात हे विमान मिळवायचे होते, परंतु त्याची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली. त्यानंतर त्यांनी मोसादवर ही जबाबदारी दिली. १९६४ मध्ये मोसादच्या महिला एजंटने इराकी पायलटच्या मदतीने हे विमान इस्राइलमध्ये नेले. तथापि, विमान चोरी करण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्याने मोसादच्या एजंटला इजिप्तमध्ये फाशी देण्यात आली होती.