मुंबई – TVS मोटार कंपनी ने iQube इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कुटर दिल्लीतील काही निवडक डीलर्सकडे उपलब्ध होईल. भारतात TVS iQube ची स्पर्धा बजाज चेतक इलेक्ट्रीकसोबत होईल. देशात इलेक्ट्रीक स्कूटरचे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवून आटोमोबाईल कंपन्या नवनव्या इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च करीत आहेत. या गाड्यांमुळे प्रदूषण रोखण्यात मदत होते. त्यामुळे त्यांना जास्त पसंती आहे. शिवाय या गाड्या वजनानेही हलक्या असतात. TVS iQube आणि बजाज चेतक यांच्यापैकी कोणती गाडी उत्तम आहे ते बघूया…
TVS iQube Electric
TVS iQube मध्ये 4.4kW ची पॉवरफूल इलेक्ट्रीक मोटार देण्यात आली आहे. ही मोटार १४० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी केवळ ४.२ सेकंदांमध्ये ४० किलोमीटर प्रती तासाने वेग धरते. सर्वाधिक ७८ किलोमीटर प्रती तास असा या गाडीचा वेग आहे. हे स्कूटर सिंगल चार्जींगमध्ये ७५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. फिचर्सच्या दृष्टीने बघितले तर जिओ-फेंसिंग, नेव्हीगेशन, असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आदी गोष्टींची सुविधा आहे. भारतात या गाडीची किंमत १ लाख ८ हजार रुपये असेल.
Bajaj Chetak Electric
Bajaj Chetak Electric स्कूटर मध्ये 3kWh ची बॅटरी लावण्यात आली आहे. ही बॅटरी 4.8kW क्षमतेच्या मोटारला पॉवर देते. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही गाडी इको मोडवर ९५ किलोमीटर आणि स्पोर्ट्स मोडवर ८५ किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याची क्षमता ठेवते. या गाडीचे चार्जींगही फास्ट होते. या गाडीची किंमत भारतात १ लाख १५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.