मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९५.३० टक्के तर नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्के निकाल लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९८.७७ टक्के तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा ९२ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल उपलब्ध झाला. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.
राज्याचा निकाल असा
मुली ९६.९१ %
मुले ९३.९९ %
एकूण – ९.३०%
विभागनिहाय निकाल असा (टक्केवारीत)
कोकण – ९८.७७
पुणे – ९७.३४
अमरावती – ९५.१४
मुंबई – ९६.७२
नागपूर – ९३.८४
लातूर – ९३.०९
नाशिक – ९३.७३
कोल्हापूर – ९७.६४
औरंगाबाद – ९२.००