नाशिक – सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कॅपॅसिटर उत्पादनातील अग्रेसर कंपनी इप्कॉस इंडिया प्रा. लिमीटेड या कंपनीतील कामगारांच्या बोनस संदर्भात व्यवस्थापन व सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन पदाधिकारी यांच्यात १ नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली. यामध्ये इप्कॉस कंपनीतील कामगारांना २५ हजार रुपये ते ५७ हजार रुपये दिवाळी बोनस कंपनीमधील एकूण ४४१ कायम कामगारांना सदरचा बोनस मिळणार आहे. कायम कामगारांच्या सेवाजेष्ठतेनुसार सदर बोनस देण्यात येणार आहे. सदर बोनस करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर एच. एस. बॅनर्जी, अनिल दैठणकर व युनियनच्या वतीने डॉ. डी. एल.कराड, सिताराम ठोंबरे, संतोष काकडे, कमिटी सदस्य छगन सनेर, प्रशांत सोनजे, भारत कोळंबे,जितेंद्र पाटील, सचिन बोरसे, संदीप दाभाडे,प्रणव पटेल, चंद्रकांत पाटील, गणेश चौधरी उपस्थित होते.