नाशिक – इन्स्पायर अवार्डसाठी जिल्ह्यातून ८५७ शाळांनी नोंदणी ३०७३ विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण केली आहे. १५ अॅाक्टोंबर अखेर पर्यंत ही मुदत होती. या नोंदणीत महाराष्ट्रात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॅा.वैशाली वीर यांनी दिली. इतक्या मोठ्या प्रमणात नोंदणी होण्याचे हे प्रमाण प्रथमच घडले असून यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रेरणा दिल्याचे वीर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे व सर्व गटशिक्षणअधिकारी, केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक व शिकत्तेतर संघटना, विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी उत्स्पूर्तपणे प्रतिसाद दिल्याचेही त्या म्हणाल्या.
शालेय मुलांमध्ये रचनात्मक विचारांची संस्कृती विकसीत करण्यासोबत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल इन्स्पायर अवार्ड भारत सरकारच्या योजनेअंतर्गत देण्यात येतो. याकडे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून बघितले जाते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात १५ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यातील एकुण ३०७३ विद्यार्थ्यांची अॅानलाईन नोंदणी झाली आहे. वीर यांच्या सहकार्याने व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यातील संशोधन असल्याबाबतचा उत्साह लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे नामांकन भरण्यासाठी सुचीत केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून ८५७ शाळांनी नोंदणी केलेली आहे. १५ अॅाक्टोंबर अखेर पर्यंत ३०७३ विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण झाली आहे. यात महाराष्ट्रात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
या अवार्डसाठी सहावी पासून ते दहावीर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतो. दरवर्षी जिल्हापातळीवरील प्रकल्प निवड संस्था यासाठी कार्य करत असते. निवड झालेल्या प्रकल्पांची जिल्हास्तरीय प्रदर्शन आयोजित केली जातात. त्यातून विजेता स्पर्धकांना राज्यस्तरावर पाठवले जाते. सर्व जिल्हास्तरीय प्रदर्शनातून १० हजार विद्यार्थी निवडून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रदर्शानासाठी पाठवले जाते. यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या ईएमआयएस या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते.