मुंबई – सोशल मिडीया एप इन्स्टाग्राम चांगलेच लोकप्रिय आहे. अगदी गावखेड्यातील तरुणापासून तर सेलिब्रीटींपर्यंत प्रत्येक जण या अॅपवर फोटो-व्हिडीयो अपलोड करीत असतात. बरेचदा सेलिब्रिटींबाबत याच अॅपवरून माहिती मिळत असते. कधीकधी एखादा व्हिडीयो किंवा फोटो आपल्याला खूप आवडून जातो. आपण फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो, मात्र आपण व्हिडीयोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. इन्स्टाग्रामवरील व्हिडीयो मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येईल, असे फिचरच आजपर्यंत आलेले नाही. पण त्यातही एक मार्ग आहे… तो जाणून घेऊया.
अँड्रॉईड युझर्ससाठी
व्हिडीओ डाऊनलोडर फॉर इन्स्टाग्राम हे अॅप सर्वांत पहिले आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. या अॅपमध्ये लॉग-इन करून इन्स्टाग्राम अॅपवर जा आणि व्हिडीओ निवडा. त्या व्हिडीओच्या वर तीन डॉट असतील त्यावर क्लिक करा आणि लिंक कॉपी करा. कॉपी केलेली लिंक व्हिडीओ डाऊनलोडरमध्ये पेस्ट करा आणि डाऊनलोडचे ऑप्शन दाबा. त्यानंतर तुमच्या गॅलरीत व्हिडीओ डाऊनलोड झालेला असेल.
आयफोन युझर्ससाठी
सर्वांत पहिले Regrammer अॅप डाऊनलोड करा. या अॅपमध्ये लॉग-ईन करून इन्स्टाग्राममध्ये जा आणि व्हिडीओ निवडा. यातील लिंक कॉपी करून रिग्रामर अॅपमध्ये पेस्ट करा. डाऊनलोड ऑप्शनवनर क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये व्हिडीओ सेव्ह झाला असेल.
इन्स्टाग्रामचे नवे फिचर
इन्स्टाग्रामने डिसेंबर २०२०मध्ये Vanish Mode लॉन्च केले होते. हे फिचर व्हॉट्सअॅपच्या डिअपिअरिंग फिचरप्रमाणे काम करते. व्हॅनिश मोडला सर्वांत पहिले अमेरिकेतील युझर्ससाठी लॉन्च करण्यात आले होते. व्हॅनिश मोडमधून पाठविण्यात आलेला मेसेज आपोआप डिलीट होऊन जाईल. सोबतच युझर्स हे मेसेजेस फॉरवर्ड करू शकणार नाहीत. यात चॅट हिस्ट्रीपण बघता येणार नाही. कुणी स्क्रीनशॉट घेतला तर त्याची माहिती नोटीफिकेशनद्वारे मेसेज पाठविणाऱ्याला मिळते.