देवळाली कॅम्प – देवळालीतील आनंद रॊडवर असणाऱ्या दर्शन अकेडमी शाळेत इनरव्हिल क्लबच्या वतीने सॅनेटरी नॅपकिन मशीन व इन्सिनरेटर मशीन मोफत भेट देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्षा मीना पाटील होत्या. यावेळी इनरव्हिलच्या सदस्या शशी मदान, आशा शेट्टी, निर्मल वर्मा, भाग्यश्री आढाव, सुरेखा गुप्ता आदी उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने इनरव्हिल क्लबचे आभार व्यक्त करताना शिक्षक राधाराणी नायडू यांनी शाळेतील मुली व महिलांची गरज ओळखून हे मशिन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल इनरव्हिल क्लबचे आभार व्यक्त केले. यासाठी संस्थेच्या व्यवस्थापक देवी लखमियानी व मुख्याध्यापिका उर्मिला शर्मा यांचे मोलाचे सहकार्य केले.
अनेक ठिकाणी मशीन भेट दिल्या
स्वच्छतेचे महत्त्व वाढीस ला गलेले असतांना महिलांच्या मासिक धर्माबाबत देखील समाजात जनजागृती वाढत आहे. याच स्वच्छतेचे महत्व डोळ्यासमोर ठेऊन देवळाली इनरव्हिल क्लबने अनेक ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन मशीन व इन्सिनरेटर मशीन भेट दिल्या आहे. देवळालीच्या या शाळेतील विद्यार्थिनींची गरज लक्षात घेत शाळेस हे गरजू साहित्य भेट दिले असल्याचे प्रतिपादन इनरव्हिल क्लबच्या
मीना पाटील, अध्यक्षा इनरव्हिल क्लब