आयआयएससी बेंगळुरु
भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू (आयआयएससी बेंगलोर)तर्फे निरनिराळ्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले जात आहेत. प्रशासकीय सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी या भरती केल्या जात आहेत. ११ ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासकीय सहाय्यक (स्थायी सहाय्यक)साठी एकूण ८५ पदे भरली जाणार आहेत. यासाठी २१७०० पर्यंत वेतनमान दिले जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता व संबंधित अधिक माहितीसाठी https://www.iisc.ac.in येथे भेट द्या.
शालेय शिक्षक
उत्तर प्रदेश सरकारने शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. जवळपास चार वर्षांनंतर योगी सरकारने राज्यातील टीजीटी आणि पीजीटी (शालेय शिक्षक)च्या हजारो पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण सेवा निवड मंडळामार्फत राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १५,५०८ पदे भरली जाणार आहे. ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी) – १२,९१३ पदे आणि पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) – २५९५ पदे भरली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी http://www.upsessb.org येथे भेट द्या.
नीती आयोग
नीती आयोगाने अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अधिकारी पदाच्या नेमणुका केल्या जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावे. रिसर्च ऑफिसर आणि सीनियर रिसर्च ऑफिसर पदासाठी एकूण १३ जागांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी २४ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. रिसर्च ऑफिसर पदासाठी ५६१०० – १,७७,५०० पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे. तर सिनियर ऑफिसर पदासाठी ६७७०० – २,०८,७०० पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज व संबंधित अधिक माहितीसाठी http://www.niti.gov.in येथे भेट द्या.