नाशिक – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर येत्या महाशिवरात्रीला बंद राहणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला गवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन भाविकांना घडणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद राहणार असले तरी १० ते १४ मार्च दरम्यान मंदिर परिसर व त्र्यंबकेश्वर शहरात कलम १४४ लागू असणार आहे. त्यामुळे भाविकांना येथे गर्दी करता येणार नाही.