नाशिक – इतनी दरिंदगी कहा से लाते हो…. अपनी मर्दानगी जाकर सरहद्द पर क्याे नही दिखाते हो…हम लडकिया है, लकडीया नही... अशी महिलांच्या वेदना मांडणारी तरुण कवियित्री मिताली चौहान यांची हिंदी कविता सध्या चर्चेची ठरली आहे. हाथरस बलात्कार प्रकरणानंतर त्यांनी आपल्या मनातील वेदना कागदावर मांडल्या. त्यानंतर चांदवडचे कवी विष्णू थोरे यांनी या कवितेचे अक्षर चित्र रेखाटले आहे.
मितालीचा लहानपणीच अपघात झाला होता. त्यात तिच्या डाव्या हाताला इजा झाली. आतापर्यंत तीचे पाच अॅापरेशन झाले आहे. आजही तिचा डाव हात पूर्ण क्षमतेने काम करत नाही. पण, जगण्याची जिद्द तीने आजही सोडली नाही. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत ती उभी राहिली. त्यामुळे तिच्या कवितेतील शब्दही तितकेच धारधार आहे.
जळगाव पासून काही अंतरावर असलेल्या म्हसावद हे मिताली चौहानचे मुळ गाव. सध्या ती अौरंगाबादला येथे रहात आहे. आतापर्यंत तीचे तीन हिंदी गाण्यांचे अल्बम प्रसिध्द झाले आहे. त्यात एक अॅाडिअो व एक व्हीडीअो अल्बम आहे. त्याचप्रमाणे दोन अल्बम प्रसिध्दीच्या मार्गावर आहे. तर तीन अल्बमचे काम सुरु आहे. आई वडील मुळ बिहारचे असले तरी मितालीचे शिक्षण हे मराठीत झाले. म्हसावद येथे तीने पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेतून घेतले. त्यानंतर दहावीनंतरच्या शिक्षणासाठी ती एरंडोलच्या डीडीएसपी महाविद्यालात गेली. येथे तीने अनेक पुस्तके वाचली व येथूनच तिच्या लेखनाला सुरुवात झाली.