बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इगतपुरी- विटभट्टी मजुराला मारहाण, हातपाय बांधून गाडीतून पळवून नेले, आरोपीला अटक

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 24, 2020 | 9:34 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इगतपुरी – तालुक्यातल्या डहाळेवाडी येथे प्रकाश गोडे या मजुराला विटभट्टी मालकाने बेदम मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून त्याला चारचाकी गाडीतून पळवून नेल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी विटभट्टी मालकाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी सुनीता प्रकाश गोडे या पीडित मजुराच्या पत्नीने मालक अमोल भोसले व दोन अज्ञातां विरोधात नवऱ्याला अपहरण केल्याची घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, “विटभट्टीवर काम करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर तालुक्यातील शिरगाव येथील विटभट्टी मालक अमोल भोसले यांच्याकडून मी विटभट्टीवर विटा वाहण्यासाठी १२ हजार व माझा पती प्रकाश गोडे विटा थापण्यासाठी यांनी २० हजार रुपयांची उचल घेतली होती. सदरची रक्कम विटभट्टीवर काम करून फेडण्याचे ठरले होते व दिवाळी सणानंतर कामावर जायचे ठरले होते. परंतु, २१ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमोल भोसले व त्यांच्या दोन साथीदारांनी डहाळेवाडी येथील फिर्यादीच्या घरात घुसून प्रकाश गोडे यांना मारहाण करीत हात-पाय बांधून त्यांना चारचाकी वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेले” असे तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अमोल भोसले व त्याच्या दोन साथीदार विरोधात भादंवि कलम ३६३, ४५२, ३७४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विटभट्टी मालक वेठबिगारी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने वर्षभरात पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील २६ वेठबिगारांना मुक्त केले आहे.

दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी “समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासाठी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच मुक्त करण्यात आलेल्या वेठबिगारांना ‘तात्काळ सहाय्य’ आणि ‘दीर्घकालीन पुनर्वसन’ करण्यात यावे” अशी मागणी केली आहे.

सदर घटनेचा अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे कीरत आहे. दरम्यान आरोपी अमोल भोसले याला अटक करण्यात आली. २२ रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विना ग्यारंटी ‘ही’ बँक देत आहे महिलांना १० लाखाचे कर्ज

Next Post

सप्तशृंगी देवी दर्शनाचे ऑफलाईन पास आता येथे मिळणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201124 WA0010 1

सप्तशृंगी देवी दर्शनाचे ऑफलाईन पास आता येथे मिळणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011