इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोरलगत असलेल्या दारणा नदीपात्रात रविवारी (दि.२०) सकाळी मासेमारी करतांनाहिरामण सखाराम पवार (वय ५६) यांचा बुडून मृत्यू झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी सकाळी ६.०० वाजता पवार हे काल टाकलेले मास्यांचे जाळे काढण्यासाठी फुग्यावरून गेले होते. त्यावेळी फुग्यावरून पडून पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे मूळ गाव विंचूर दळवी असून पिंपळगाव मोर येथे ते नातेवाईकांकडे राहत होते व मासेमारी करून उदरनिर्वाह करीत होते.शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय घोटी येथे पाठवण्यात आला.पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला.