नाशिक – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कृषिक्षेत्रात दिवसेंदिवस वाढतो आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या आधारे कृषिक्षेत्राचा विकास होत असतांना जिल्ह्यातील इगतपुरी येथील मौजे धानोर्ली येथे ड्रोनच्या साहाय्याने गावठाण मोजणीचे काम करण्यात आले. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी करण्यात आली. रिमोट कंट्रोलच्या मदतीने हे ड्रोन कार्य करत असून संबंधीत क्षेत्राच्या गावठणीने मोजमाप केले गेले. नाशिक प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचाकल अजय कुलकर्णी यांच्या उपस्थित गावठाण मोजणीचे काम करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेखचे पंकज फेगडे, धानोर्ली गावाचे सरपंचव समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थितीत होते.