वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत रजतपदक मिळवून देशात दुसरा क्रमांक
इगतपुरी : छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग इंडिया या संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील खेळाडू तेजस चंद्रकांत भागडे या युवकाने ८५ किलो वजनी गटात राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत रजतपदक मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. या दैदीप्यमान विजयाबद्दल या खेळाडूचे इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी कौतुक होत आहे.
आजोबा कै. दादापाटील भागडे यांची प्रेरणा घेऊन पोलीस पुत्र असलेल्या कु. तेजस भागडे या युवकाला बालपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्याने जिम ट्रेनर्सचा कोर्स पूर्ण केला. ट्रेनर्सचे काम करताना त्याला वेट लिफ्टिंगबाबतच्या अँकेडमीची माहिती मिळाली त्याआधारे सराव करून तेजस भागडे याने महिन्याभरापूर्वी जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. पंधरा दिवसापूर्वी छत्तीसगढ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या युवकाने दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन करून जिल्ह्याचे,इगतपुरी तालुक्याचे नाव रोशन केले.
आगरी सेनेच्या वतीने आज घोटीत तेजस भागडे याचा सत्कार करण्यात आला. आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपतराव कडू यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी यावेळी पं स सदस्य विठ्ठल लंगडे, मार्गदर्शक सुरेश कडू, युवा आगरी सेना प्रदेश उपाध्यक्ष गणेश कडु, युवा जिल्हाध्यक्ष अरूण भागडे, उपाध्यक्ष अनिल भोपे, संपर्क प्रमुख लालु दुभाषे, ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, विकास जाधव, हिरामण कडु, अँड. हनुमान मराडे, कैलास कडु, निलेश जोशी, चंद्रकांत भागडे, विठोबा भागडे, सौ अनुसया भागडे, तन्वी भागडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अनिल भोपे यांनी केले.