कोरोना योद्धांचा सत्कार करून रंगपंचमी केली साजरी
घोटी- गेल्या महिन्यापासून कोविडची महामारी पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने इगतपुरी तालुक्यात लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मनसे जिल्हा सघंटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते. त्यामुळे आज इगतपुरी तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याचे मनसेच्या पदाधिका-यांनी सांगितले.
जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यात पण त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. त्यामुळे बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा प्रशासनाने ” कोरपगाव ” येथे अतितातडीने सुरू केले आहे. त्यामुळे मनसेच्या मागणीला यश आल्याचेही मनसे पदाधिका-यांनी सांगितले. या निर्णयामुळे तहसीलदार परमेश्वर कासुळे त्यांनी आभार मानले. स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोरपगाव कोविड सेंटर मध्ये २४ तास सेवेस असलेले डॉ. देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय मागडे, डॉ. अश्विनी सानप,नर्स प्रीती खुताडे, अजित गुरव,नितीन नेतावडे व इतर नर्स,सफाई कर्मचारी , रुग्णवाहिका चालक या कोरोना योद्धयाना रंगपंचमी निमित्ताने रंगाचा टिळा लावून, शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे ,रामदास आडोळे,जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, जिल्हाउपाध्यक्ष आत्माराम मते, ता.अध्यक्ष कृष्णा भगत, उपतालुकाअध्यक्ष संजय सहाणे, हार्दीप चौधरी, संतोष कडवे,माजी सरपंच कैलास भगत, माजी सरपंच हरिष चव्हाण, कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, प्रवीण भटाटे,अशोक हेमके,निलेश पवार व इतर राजसैनिक उपस्थित होते.