….
अनुसूचित जाती प्रवर्ग : कुऱ्हेगाव, मुरंबी
अनुसूचित जमाती प्रवर्ग : मुकणे, गोंदें दुमाला, समनेरे
नागरिकाचा मागास वर्ग : भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, निनावी, साकुर, शेनीत ल, नांदूरवैद्य, मुंढेगाव, मालुंजे, जानोरी
सर्वसाधारण प्रवर्ग : शेणवड खुर्द, गरुडेश्वर, कृष्णनगर, लक्ष्मीनगर, घोटी खुर्द, कावनई, वाडीवऱ्हे, पिंपळगाव डुकरा, नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख, शिरसाठे, मोडाळे, वाघेरे, माणिकखांब, सांजेगाव, बेलगाव कुऱ्हे, दौडत, भरवीर खुर्द
वरील आरक्षण पडले असले तरी या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या पंचायती स्त्रियांसाठी आरक्षित करायच्या याची सोडत जिल्हाधिकारी यांचेकडून लवकरच काढण्यात येणार आहे.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये या आधीच निवडणुका होऊन तिथे सरपंच पद भरले गेलेले आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये हे आरक्षण लगेचच लागू होणार नाही. सरपंच यांचा राजीनामा, अपात्रता, अविश्वास ठराव अशा कारणांमुळे सरपंच पद रिक्त झाले तर त्या गावांमध्ये आज काढलेले आरक्षण तात्काळ लागू होईल. यासह ४ मार्च २०२५ पर्यंत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर त्यासाठी सरपंच पदाला वरील आरक्षण लागू राहील.
भास्कर सोनवणे, पत्रकार