इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथे जिओ कंपनीचा टॉवर असून या परिसरातील सर्वाधिक युजर्स हे जिओचेच आहेत. परिसरात मोजक्याच मोबाइल नेटवर्क कंपन्याचे नेटवर्क आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अधरवड येथील जिओ टॉवरवर आधारित ग्राहकांना नेटवर्क साठी खूप अडचणी येत आहेत. दर अर्धा किंवा एका तासाला काही मिनिटांसाठी नेटवर्क पूर्णपणे गायब होणे, इंटरनेटचा स्पीड कमी होणे अशा अनेक अडचणींना येथील जिओ ग्राहकांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत नेमकी तक्रार कोणाकडे करावी याबद्दल ही परिसरात काहीच माहिती नाही. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांना ही प्रचंड अडथळा येत आहे. परिसरातील व्यापारी,नागरिक यांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची तातडीने दखल घेत सदर जिओ नेटवर्क कंपनीने याबाबत दुरुस्ती करून सुरळीत नेटवर्क पुरवठा करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
कंपनीने तातडीने दूरुस्ती करावी
मी गेल्या काही दिवसांपासून जिओचा ग्राहक आहे. परिसरात फक्त जिओचाच टॉवर आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक नेटवर्क गायब होते, इंटरनेट स्पीड कमी होत असल्याने अनेक अडचणी येत असल्याने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. कंपनीने तातडीने दूरुस्ती करावी
– प्रभाकर मुठाळ, ग्राहक, जिओ