इगतपुरी – इगतपुरी येथील ब्रहण महाराष्ट्र दारू या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे . दारू उत्पादन प्रक्रियेत नियमाचे उल्लघंन केल्यामुळे ही कारवाई केल्याचे अधिका-यांनी सांगितले. दारु उत्पादकावर अन्न व अौषध प्रशासनाची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. अन्न व सुरक्षा विभागाने २०१८ च्या अन्न सुरक्षा कायदा नुसार दारू उत्पादन प्रक्रिया नियमानुसार असावी लागते. पण, या या कंपनीत उत्पादन करतांना नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या दारू कंपनीवर अन्न सुरक्षा सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे, सहायक आयुक्त गणेश परळीकर.सहायक आयुक्त उदय लोहकरे, राजेंद्र सुर्यवंशी.अनील रासकर.आदीच्या पथकाने ही कारवाई केलली. या कारवाईत नमुने तपासणीसाठी घेतले तसेच उत्पादन प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन करत आसल्याचे आढळून आल्याने या कंपनीचे उत्पादन तातपुरते बंद करण्यात केल्याचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितले