नवी दिल्ली – संपूर्ण देश ज्या घोषणेची आतूरतेने वाट पाहत आहे त्याची घोषणा झाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआयचे संचालक व्ही जी सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या दोन्ही लसींना डीसीजीआयची परवानगी आवश्यक आहे. त्यासंदर्भातील घोषणा डीसीजीआयच्याने केली आहे. ही घोषणा झाल्यामुळे या दोन्ही लस भारतात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील नियोजित कोरोना योद्ध्यांना ही लस मिळू शकणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य नागरिकांना ती उपलब्ध होणार आहे.