नवी दिल्ली ः देशात इंधन दरवाढीविरोधात जनक्षोभ वाढत असताना गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याव्यतिरिक्त गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असताना गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढल्या आहेत. इंधनदरवाढीवरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारनं देश आणि घराचे बजेट बिघडवले आहे, असं टीकस्त्र राहुल गांधी यांनी सोडलं आहे.
आगीत तेल
शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैसे प्रतिलिटरनं वाढ झाली आहे. या वाढीनंतर राज्यात विविध ठिकाणी ९४ रुपयांच्या पुढे गेली आहे. तर डिझेल ८४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीसुद्धा २५ रुपयांनी वाढल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.