मुंबई ः देशात इंधनदरवाढीवरून सर्वसामान्यांचा रोष वाढत असताना दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९७.३४ रुपयांवर पोहोचले असून, डिझेल ८८.४४ रुपये झाले आहे. त्यापूर्वी सलग १२ दिवस इंधन दरवाढीनंतर गेल्या दोन दिवसात दरवाढ झाली नव्हती.
एक जानेवारीला दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ८३.७१ रुपये होती. तर डिझेलची किंमत ७३.८७ रुपये होती. परंतु २३ फेब्रुवारीला दिल्लीत पेट्रोल ९०.९७ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. आणि डिझेल ८१.३६ रुपयांवर पोहोचले आहे. यावर्षी ५४ दिवसात दिल्लीत पेट्रोल ७.२२ रुपये आणि डिझेल ७.४५ रुपयांनी महाग झाले आहे.
पंधरा दिवसांत दर भिडले गगनाला
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ९ फेब्रुवारीपासून वाढू लागल्या आहेत. ८ फेब्रुवारीपर्यंत एक लिटर पेट्रेल ८६.९५ रुपयांना मिळत होतं. तर डिझेल ७७.१३ रुपये प्रतिलिटर मिळत होतं. पंरतु २३ फेब्रुवारीला एक लिटर पेट्रोल ९०.९७ रुपये आणि डिझेल ८१.३६ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. पंधरा दिवसातच पेट्रोल ३.९८ रुपये आणि डिझेल ४.१९ रुपयांनी महागलं आहे.
राज्यातल्या प्रमुख शहरातले दर
मुंबई – पेट्रोल – ९७.३४ रुपये, डिझेल – ८८.४४ रुपये
पुणे ः पेट्रोल- ९६.९८ रुपये, डिझेल- ८६.७४ रुपये
नाशिक ः पेट्रोल- ९७.६८ रुपये, डिझेल- ८७.४२ रुपये
नागपूर ः पेट्रोल- ९७.८४ रुपये, डिझेल- ८८.९९ रुपये
औरंगाबाद ः पेट्रोल – ९८.५० रुपये, डिझेल- ८९.६० रुपये