दिंडोरी – तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. आज झालेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी कु वर्षा धनराज कोरडे व उपसरपंच पदासाठी शिवाजी खंडेराव दरगोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मच्छिंद्र बेंडकुळे, सौ रोहिणी गवळी, सौ पुष्पा धात्रक, माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे, अनिल दरगोडे, भगवंत दरगोडे, चंद्रकांत दरगोडे, प्रभाकर धात्रक अनिल उमरे शिवाजी उमरे, सिकंदर उमरे,निवृत्ती केदार,अजय कोरडे,ज्ञानेश्वर गवळी,धनराज कोरडे,योगेश धात्रक, कृष्णा धात्रक,संगम दरगोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते