इंडिया दर्पण – हास्य षटकार – अंधश्रद्धा
मन्या शनिवारी नखे कापत बसला होता.
ते पाहून
आजोबा म्हणाले, बाळा शनिवारी नखे कापू नयेत.
मन्या – मी अंधश्रद्धाळू नाही.
असल्या भाकडकथा मी मानत नाही.
आजोबा – ही अंधश्रद्धा नाही बाळा.
व्यवहारीक सोईसाठी
केलेला नियम आहे.
शनिवारी नखे कापली तर
शनिवारी व रविवारी रात्री
बिअरचे कॅन उघडण्यास अवघड जाते.
तसेच
चिवडा, चकली, वेफर अशी
चखण्याची पाकीटे
चटकन उघडता येत नाहीत.