इंडिया दर्पण – हास्य षटकार – वाहतूक पोलिस
एक महिला
सिग्नल तोडून पुढे गेली
आणि
तिचे बघून आणखी ४ जण
सिग्नल तोडून जाऊ लागले.
तेवढ्यात
वाहतूक पोलिसांनी
त्यांना हटकले
आणि दंड केला.
त्यांच्यापैकी एक जण म्हणाला :
साहेब, ती महिला जेव्हा
सिग्नल तोडून गेली
तेव्हा तिला का नाही पकडले??
साहेब म्हणाले :
कारण ती आमचाच माणूस आहे.
वेगवेगळ्या सिग्नलवर ती पुढे असते
आणि
सिग्नल तोडते.
तिच्या मागून तुमच्या सारखे
अनेक आम्हाला सापडतात.
काय करणार??
मार्च एन्डचे टार्गेट आहे.