इंडिया दर्पण – हास्य षटकार – दुकानाची पाटी
सलूनच्या दुकानावरील पाटी…
“आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही,
मात्र
डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू”…
इलेक्ट्रिक दुकानातील फलक…..
“तुमच्या बुद्धीचा प्रकाश पडो ना पडो,
आमच्या बल्बचा नक्की पडणार”…
चहाच्या टपरीवरील पाटी….
“मी साधा माणूस आहे
पण
चहा मात्र खास बनवतो.”…
उपाहारगृहाबाहेरील फलक…
“इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही,
आपण बिनधास्त आत या”….
इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून मन भरून आलं ..
“आपला कुणी फॅन नसेल
तर
आमच्याकडून एक घेऊन जा”..
पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
“पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी
तोंड मात्र मोठं हवं,
म्हणजे जबडा मोठा उघडा”…
फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली…
“तुम्ही फक्त कर्म करा,
फळ आम्ही देऊ”…
घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला….
“पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा,
पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा
हातात बांधा”…
ज्योतिषाने फलकावर लिहिलं होतं…..
“या आणि फक्त १०० रुपयांत
आपल्या आयुष्याचे
पुढील एपिसोड बघा …”