रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण – हटके डेस्टिनेशन – हळेबीड

by Gautam Sancheti
मार्च 10, 2021 | 5:09 am
in इतर
0
IMG 20210310 WA0002 e1660321637296

हळेबीड (कर्नाटक)

नमस्कार, आपल्या देखो अपना देश या मालिकेत आपण भेट देणार आहोत प्राचीन भारताचे वैभव बघण्यासाठी हळेबीड येथे. अप्रतिम ठिकाण असलेल्या या भागात पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. तर वेळ न दवडता आपण सफर करुया या सुंदर ठिकाणाची…
भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
हळेबीड हे कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी या गावाला द्वारसमुद्र असे म्हटले जायचे. हळेबीड या गावाला तेथील मंदिरे, शिल्पे आणि तीर्थक्षेत्र यांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. होयसळ राजांंच्या कालखंडात (१२व्या शतकामध्ये)  हळेबीड ही राजधानी होती. येथील होयसळ कालीन स्थापत्य कला आणि भव्य मंदिरे, जैन मंदिर यांंमुळे हे स्थळ जणू वास्तुकलेच्या रत्नांची खाणच भासते.
पुढील पिढीला आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसांची माहिती व्हावी, असे वाटत असेल तर हळेबीड हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे होयसळेश्वर आणि केदारेश्वर ही मंदिरे आहेत. या ठिकाणी १४ व्या शतकामध्ये दिल्ली सल्तनतीचाचा सुलतान मलिक काफूरने या भागाची लूट करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे स्थळं बराच काळ दुर्लक्षितच होते.
येथील होयसळेश्वर मंदिर १२व्या शतकात येथील राजा विष्णूवर्धन यांनी तेथील मानवनिर्मित तलावाच्या किनारी बांधले. हे मंदिर या भागातील सगळ्यात मोठे शिवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम जवळपास ४० वर्ष सुरू होते, असे म्हणतात. हे एक जोडमंदिर आहे. यातले एक मंदिर होयसळेश्वर आणि दुसरे संताळेश्वराचे मंदिर आहे. एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी संकल्पना असलेली ही दोन्हीही शिव मंदिरे आहेत. विशेष म्हणजे या मंदिरासमोर दोन स्वतंत्र नंदी आहेत.

IMG 20210310 WA0001

या मंदिराच्या भिंतींवर पुराणातील अनेक दंतकथा कोरल्या आहेत. बाहेरील भिंतीवर रामायण आणि महाभारतातील अनेक कथा आपल्याला दिसतात. मंदिराची कलाकृती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. प्रत्येक भिंत आणि कलाकृतीवर लिहायचे ठरवले तर एखादे पुस्तकच या मंदिरावर होईल. या अवर्णनीय कलाकृतीचे साैंदर्य डोळ्याने पहिल्याशिवाय उमजणार नाही. अनेकांनी या मंदिरावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे व डॉक्युमेंट्रीही बनविल्या आहेत.
होयसळेश्वर मंदिर जेवढे सुंदर आहे त्याच तोडीचे केदारेश्वराचेही मंदिर आहे. केदारेश्वराचे मंदिर राजा वीर बल्लाळ आणि राणी केतलादेवी ११७३ ते १२२० च्या कालखंडामध्ये  बांधले. हे मंदिर पुरातत्व खात्याकडून जतन करण्यात येत आहे. हे मंदिर साबणासारख्या मऊ वाटणाऱ्या, कोणतेही कोरीव काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा दगडापासून बनवले आहे.

EgHp5PyU8AAkRId

जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या मंदिराला तीन गाभारे आहेत आणि यात ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. बाह्य भिंतीवर पुरातन काळातील अनेक वेगवेगळ्या कथा कोरल्या आहेत. हे मंदिर ताऱ्याच्या आकारात बांधले असल्यामुळे हे इतर मंदिरापेक्षा वेगळे आहे.
या दोन्ही मंदिरासोबतच अनेक लहान मोठी मंदिरे या गावात आहेत, प्रत्येक मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुमचा वेळ कसा जाईल, हे कळणारही नाही. काही तरी अद्भुत बघत आहोत, याची अनुभूती येईल यात काही शंका नाही.

EsO6ARqU0AMy5Dk

काय बघाल
येथे तुम्ही होयसळेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, पुरातत्व विभागाचे संग्रहालय,  बेलूर मंदिर (१५ किमी), यागाची डॅम आणि जवळच असलेलं बदासी हल्ली हे ऐतिहासिक प्रसिद्ध जैन मंदिर तुम्ही पाहू शकता.
भेट देण्यास योग्य वेळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ असेल.

EbBbzOkUYAASnv0

कसे पोहचाल
मंगलोर विमानतळ येथून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. तर हसन रेल्वे स्टेशन हे अवघ्या २७ किलोमीटर अंतरावर आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओकडून छोट्या व्यवसायांसाठी स्वस्त आणि परवडणारी ब्रॉडबँड योजना

Next Post

पिंपळनेर येथे सुरु होत आहे मोऱ्या चित्रपटाचे शुटिंग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
स्थानिक बातम्या

मालेगावमध्ये चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या पात्रात फेकून बापाने स्वत:ही पाण्यात उडी मारत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

ऑगस्ट 24, 2025
IMG 20250824 WA0380 1
राज्य

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हे वक्तव्य

ऑगस्ट 24, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

…तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडकी बहिण योजनेवर रोहित पवार यांचा सवाल

ऑगस्ट 24, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची मोटरसायकल रॅली…लोकांचा मोठा प्रतिसाद

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या घरी उध्दव ठाकरे जाणार….सरप्राइज आले समोर

ऑगस्ट 24, 2025
Next Post
IMG 20210309 WA0006

पिंपळनेर येथे सुरु होत आहे मोऱ्या चित्रपटाचे शुटिंग

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011