शाळेचे इन्स्पेक्शन
शाळेचे इन्स्पेक्शन असते. अधिकारी वर्गात येतात. समोर बसलेल्या विद्यार्थ्याला नाव विचारतात.
अधिकारी : बाळा तुझे नाव काय?
विद्यार्थी : पांडू
अधिकारी : बाळा पांडुरंग म्हणायचं.
अधिकारी शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला : बाळा आणि तुझे नाव काय?
विद्यार्थी : बंडुरंग
– हसमुख