एकशेतीन वर्षांच्या अॅथेलेट मानकौर
मोदी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या परितोषिकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात निवडले जाणारे पारितोषिक विजेते फारसे प्रकाशात आलेले नसतात. देशाच्या सांधी कोपऱ्यात दडलेल्या गुणी व्यक्तींना शोधून काढून त्यांना प्रकाशात आणणे आणि त्यांच्या गुणांचा यथोचित गौरव करणे हे अवघड पण अत्यंत महत्वाचे काम ह्या सरकारने सातत्याने केले गेले आहे. याच परंपरेत चपखल बसेल असा एक सत्कार ह्यावर्षीच्या महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. त्या सत्कारार्थी आहेत तब्बल १०३ वर्षांच्या अॅथेलेट मानकौर.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
मानकौर यांचा जन्म १९१६ सालचा. त्या तशा एक साध्या पंजाबी घरातल्या गृहिणी. लहानखुरी शरीरयष्टी. जेमतेम पांच फुटाची उंची. फक्त पंजाबी भाषेत संवाद करणाऱ्या. मुलगा गुरुदेव सिंह हेच त्यांच्यासाठी दुभाषा म्हणून काम करतात. ट्रॅकवर त्यांनी पाऊल टाकले ते त्यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षी. त्यानंतर मात्र सातत्याने त्यांनी सराव केला आणि २०१७ मध्ये न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये भाग घेताना, त्यांनी १०० मीटर धावण्याचे उद्दिष्ट ७४ सेकंदात गाठले.
नंतर दोन वर्षांनी पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली आणि ३६ सेकंदात १०० मीटरचे अंतर त्यांनी पूर्ण केले. या स्पर्धेत त्यांनी शॉट पुट, भाला, साठ मीटर डॅश आणि दोनशे मीटर धावणे अशा चार स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि त्या चारही स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
मानकौर यांचा ८१ वर्षाचा मुलगा सरदार गुरुदेव सिंह हेच त्यांचे प्रशिक्षक आहेत. त्यांना आणि सरदार गुरुदेव सिंह यांना हिमाचल प्रदेशातल्या बारू साहिब मधील विद्यापीठामध्ये दोन आठवड्यांसाठी बोलावले गेले, परंतु त्यांच्या तिथल्या वास्तव्यात केवळ त्यांच्याच नव्हे तर तिथल्या इतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुद्धा अशाच प्रकारची सुधारणा झाली. त्यामुळे त्यांना तिथेच राहण्याची विनंती करण्यात आली.
१०३ व्या वर्षी मानकौर केवळ शरीरानेच तंदुरुस्त राहिलेल्या नाहीत तर ती इतरांना तिच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. कौरला अजूनही धावण्याची आवड आहे, असे तिचा मुलगा सांगतो. ती निवृत्त होण्याचा विचार करत नाही आणि सिंग म्हणतो की तिला अजूनही वाटते की ती आपली कामगिरी सुधारू शकेल.
मानकौर त्यांच्या प्रशिक्षक असणाऱ्या गुरुदेव सिंग यांनी बनवलेल्या कडक आहार योजनेचे कठोरपणणे पालन करतात. ज्यात घरगुती सोया दूध आणि केफिर, गव्हाचा रस, शेंगदाणे, मसूर आणि अंकुरलेल्या गहूपासून बनवलेल्या चपात्यांचा समावेश आहे. हा सर्व अॅथेलेटस साठी एक प्रकारचा सल्लाच आहे, असे त्यांचे मत आहे.
तथापि हे अॅथेलेटिक प्रकार साधे , मजेशीर आणि गंमतीतले नव्हते. ऑगस्टमध्ये पित्ताशयाच्या विकारावरच्या उपचारासाठी त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यांना ऑस्टिओपोरोसिसमुळे तिला पाठीचा त्रास देखील होत असल्याचे त्यांचा मुलगा म्हणतो. तरीही त्यांना जिंकणे आवडते आणि त्या ट्रॅकवर सर्वात आनंदी आहेत, जिथे त्यांचे म्हणणे आहे की त्या त्यांच्या सर्व आजारांना विसरल्या आहेत.









