हेल्प फॉर यू
ABCD म्हणजेच आया, बाई, कूक, ड्रायव्हर आणि तत्सम सर्व प्रकारच्या कामगारांसाठी नोकरी मिळवण्यासाठी हक्काची जागा निर्माण केली आहे मीनाक्षी जैन-गुप्ता यांनी. हजारो निराधारांना आधार व हजारो उच्चभ्रू कुटुंबांना विश्वासू नोकर मिळवून देत असताना स्वतःचा शेकडो कोटींचा व्यवसाय उभा करणाऱ्या या भन्नाट स्टार्टअप ‘हेल्पर फोर यू’ बद्दल जाणून घेऊया . . .
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।
याच तत्वज्ञानावर विश्वास ठेऊन आज मीनाक्षी गुप्ता-जैन आपला व्यवसाय करत आहे आणि तिला फळंही तसेच मिळत आहे. तिच्या जीवनाचे उद्दिष्ट हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गोरगरिबांना मदत करून, त्यांना रोजगार मिळवून देण्याचे आहे. आणि त्यादृष्टीने तिची वाटचालही सुरु आहे. एका महिलेने वयाच्या पन्नाशीत एक आगळा वेगळा व्यवसाय निवडला, ज्यात अर्थार्जनासोबतच समाजसेवा देखील घडत आहे. पाहू या ह्या स्त्री शक्तीचे हे सीमोल्लंघन. . .
मीनाक्षी हिचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. वडिल सुरक्षा दलात असल्याने त्यांची सारखी बदली होत असे. त्यामुळे अनेकदा आपला परिवार सोबत घेऊन जाणे त्यांना शक्य होत नसे. मीनाक्षी आपल्या आई व बहिणीसोबत रहात. तिच्या वडिलांनी प्रमाणे लग्नानंतर तिच्या पतीची नोकरी देखील अशीच सतत बदलीची होती. आणि असेच नवनवीन ठिकाणी बदली होत असताना ती प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रयोग करून नवीन काहीतरी करण्याचा सतत प्रयत्न करत असे.
एकदा दिल्लीहून मुंबईला बदली झाली त्यावेळची गोष्ट. आपली टाटा ग्रुप मधली नोकरी सांभाळून व्यवसायाच्या दृष्टीने तिने पहिले पाऊल टाकले. मीनाक्षीची मुलगी ही दिल्लीमध्ये संगीतातील कीबोर्ड शिकत होती तर तिचे पती हे तबला वादनाचे धडे घेत होते. पण आता दिल्लीहून मुंबईला बदली झाल्यानंतर नवीन शहरांमध्ये हे नवीन क्लासेस कुठे शोधावे हा तिला फार मोठा प्रश्न पडला होता.
नेमकं कोणत्या एरिया मध्ये किती क्लासेस आहेत आणि त्यातलं कोण कुठले कुठले वर कशी करतात याची माहिती ही केवळ रेफरन्स मधूनच मिळू शकत होती. त्यावेळेला तिला असं वाटलं की ही एखादी वेबसाईट असावी की जात सर्वच शालेय शिक्षणाव्यतिरिक्तच्या शिक्षकांची व क्लासेसची माहिती असावी.
अनेक प्रयत्न करून अशी वेबसाईट शोधण्याचा तिने प्रयत्न केला परंतु अशी वेबसाईट तोपर्यंत अस्तित्वात नव्हती. हे मीनाक्षीच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे ती ही आपली स्वतःची ‘क्लिक फोर कॉच’ या नावाने एक वेबसाईट सुरू केली. यात तिने आपल्या परिसरातील सर्वच क्लासेसमध्ये फिरून प्रत्येक शिक्षकाची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व माहिती गोळा केली व आपल्या वेबसाईटवर टाकली. २०१३ मध्ये सुरू केलेली ही वेबसाईट आज देखील कार्यरत आहे.
आपले पती आणि परिवारासोबत दिल्लीहून मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीत बसलेले असतांना मीनाक्षीला फोन आला. फोन त्यांच्या कामवाल्याबाईचा होता. त्या बाईच्या मुलीची प्रसुती झाल्याने ती काही दिवस येणार नव्हती असा निरोप मिळाला. फोन झाल्यानंतर कामवाल्याबाईच्या आनंदात सहभागी होतांना मात्र तिच्या मनात आणखी एक विचार आला. आणि तो म्हणजे, आता घरची कामं कुणी करायची?
कारण संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आणि सर्व स्वच्छता, स्वयंपाक देखील करायचा आहे. तेव्हा ह्या मोठ्या प्रश्नावर चिंतन करत असतांना तिच्या मनात सहज आले की अशी एखादी डिरेक्टरी तरी असावी ज्यात सर्व काम वाल्याबाईंचे संपर्क क्रमांक असावेत. असे सहज बोलता बोलता, तिला एक भन्नाट कल्पना सुचली. ती म्हणजे एका वेबसाईटची. ह्या वेबसाईट वर सर्व कामवाल्याबायांचे प्रोफाइल तयार करावेत आणि ज्यांना गरज असेल त्यांनी हवे त्या मोलकरणीला कॉल करून बोलवावे. ह्यातून घर मालकीण व कामवाल्याबाई दोघींचेहि प्रश्न सुटतील. आणि ह्याच कल्पनेतून उभे राहिले ते म्हणजे आजच्या ‘हेल्परफॉरयू .इन’ चे पहिले स्वरूप ‘मेड फॉर यू’ (Maid for you).
हा असंघटित कामवाल्या बायकांना एकत्र करून नोकरी मिळवून देण्याचा पहिलावहिला प्रयत्न. या वेबसाईटला त्यांनी स्वतः तांत्रिक ज्ञान असल्याकारणाने तयार केले. ह्या ॲप आणि वेबसाईटची जाहिरात त्यांनी आपल्या परिसरातील सर्व मोठ्या मोठमोठ्या सोसायटी मध्ये करायला सुरुवात केली. खरंतर उच्चभ्रू वस्तीमध्ये एखाादी उत्तम विश्वासू कामवाली मिळवणे हा फार मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांच्या आपला फार कमी कालावधीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.
मुंबईच्या परिक्षेत्रात सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू मुंबई महानगराच्या अनेक भागांमध्ये सहज पोचू लागला. आणि हेच काम करत असताना मीनाक्षीच्या असं लक्षात आलं की केवळ कामवाली उत्तम मिळवणं हा एकमेव प्रश्न आज लोकांना भेडसावत नाहीये. तर कामवाली सोबतच एक उत्तम ड्रायव्हर मिळवणे एक उत्तम स्वयंपाकी किंवा आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी एक चांगली आया मिळवणं हे देखील सर्वांनाच भेडसावणारे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना देखील आपण आपल्या ॲप आणि वेबसाईट मार्फत उत्तर देऊ शकतो असा विश्वास वाटून मीनाक्षीने आपल्या कार्य क्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.
अब नौकरी पाना आसान है!
घरेलू सहायकों की भर्ती आसान बना दी!#jobseekers #jobsearch #employment #staffing #domesticwork #helpers #helper4U #H4UJobs pic.twitter.com/I1j3eGNk5g— Helper4U.in (@HelperForU) January 21, 2021
तिने पुन्हा यासाठी लागणारे डेटाबेस उभा करण्याची तयारी केली आणि जोमाने कामाला सुरुवात केली. आणि ह्याच आत्मविश्वासाच्या जोरावर मेड फॉर यू चे नवे आणि विस्तारित स्वरूप हेल्पर फोर यू डॉट इन या नावाने २०१६ साली स्थापन करण्यात आले. आजपर्यंत उत्तम कामवाली मिळवणे किंवा कुठल्याही प्रकारे हेल्पर मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ शेजारपाजारच्या न विचारणे किंवा फार तर तुमच्या सोसायटीच्या सिक्युरिटी कडून चांगल्या कामवालीचा रेफरन्स आणि मोबाईल नंबर मिळवणे इथपर्यंतच तुमचं कार्यक्षेत्र सीमित होतं. पण आज हेल्पर फोर यू या वेबसाईट द्वारा तुमच्या शहरातील सगळ्या प्रकारचे हेल्पर्स त्यांचे रेटिंग त्यांची कार्यपद्धती व त्यांच्या कार्यशैलीला दिलेल्या कमेंट्स या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकतात व त्याचा उपयोग स्वतःसाठी करवून घेऊ शकता.
हेल्पर फोर यू ची कार्यपद्धती जर आपण पाहिली तर त्यात सर्व प्रकारच्या घरगुती सेवा देणाऱ्या व्यक्तींचे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यात येते. ही रजिस्ट्रेशन करत असताना त्यांच्याकडून एक विस्तृत फॉर्म भरून घेतला जातो व त्यांचे फोटो देखील त्यासोबत मिळवले जातात. रजिस्ट्रेशन फॉर्म मराठी हिंदी व तत्सम लोकल भाषांमध्ये उपलब्ध असतो. यासोबतच त्या व्यक्तीचा आधार कार्ड ची झेरॉक्स व ॲड्रेस प्रुफ देखील घेतले जाते. आणि हे सर्व रजिस्ट्रेशन करून घेताना ह्या कामगारांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे आकारण्यात येत नाहीत.
ज्या लोकांना अशा कामगारांची गरज असते ते लोक Helper4u च्या वेबसाईट वर जाऊन स्वतःचं लॉगीन क्रिएट करतात. त्या लॉगीन मध्ये तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे योग्य ते कामगार शोधता येतात. हे लोगिन क्रियेट करताना तुम्हाला काही माफक रजिस्ट्रेशन चार्ज भरावा लागतो. तुम्ही तेच अर्ज भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांक हा तुम्हाला मिळतो व तुम्ही थेट त्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्याला नोकरी देऊ शकता.
पवई येथे सुरुवातीला या वेबसाईटची चाचणी घेण्यात आली पण अतिशय कमी कालावधी मध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या कारणाने त्याच वर्षी या व्यवसायाचा विस्तार मुंबई सकट पुण्यात देखील करण्यात आला. आणि अगदी पुढच्याच वर्षी दिल्ली व त्यासोबतच बेंगलोर सारख्या शहरांमध्ये देखील या व्यवसायाचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला. व्यवसायाची लोकप्रियता इतकी वाढत होती की मीनाक्षी ला अखेर आपल्या टाटा ग्रुपमधील नोकरीचा त्याग करावा लागला.
या संपूर्ण व्यवसायात तिच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले ते तिचे पती पुनीत. अतिशय कमी कामगारांमध्ये आज ही कंपनी शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे. आज पर्यंत या कंपनीला अनेक व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. आज केवळ एक व्यवसाय म्हणून नव्हे तर निराधारांचा आधार म्हणून आणि अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारी संस्था म्हणून आज हेल्पर फोर यू ही प्रचलित झाली आहे. आणि या संस्थेला केवळ कामगारच नव्हे तर अनेक उच्चभ्रू कुटुंबांना देखील एक आधार म्हणून आज helper4u उभी आहे.