स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सौंदर्य. आणि ह्याच सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायासाठी एका महिलेने १ कोटी पगाराची नोकरी झुगारून अनेक कोटींचा व्यवसाय निर्माण केला आहे. जाणून घेऊया या करारी महिला उद्योजिकेच्या शुगर कॉस्मेटिक्स या भन्नाट स्टार्टअपबद्दल…
सौंदर्य हा सर्वच महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्यावर सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून ते अधिक खुलविण्यासाठी प्रयत्न नेहमीच केला जातो. पण हे करत असताना वापरलेले सौंदर्य प्रसाधने म्हणजेच कॉस्मेटिक्स तुमच्या त्वचेला आणि तुमच्या कंपलेक्शन ला सूट होतात की नाही याचा विचार करणे देखिल तितकच महत्त्वाचं असतं.
भारतात आज अनेक जागतिक ब्रँड जसे लॅक्मे लॉरियल ओरिफ्लेम हे उपलब्ध आहेत. पण अनेक महिलांच्या मते हे कॉस्मेटिक्स भारतीय महिलांच्या त्वचेशी एकरूप होत नाहीत. त्यामुळे भारतीय महिलांसाठी योग्य अशी सौंदर्य प्रसादने क्वचितच बाजारात उपलब्ध होती. त्यात देखील आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कॉस्मेटिक्स च्या किमती या गगनाला भिडलेल्या असत. यासोबत काही लोकल उत्पादकांनी तयार केलेल्या कॉस्मेटिक्स किमतीने स्वस्त असल्या तरी त्याचे त्वचेवर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता तेही न परवडणारे ठरत.
भारतीय महिलांच्या त्वचेला व कंपलेक्शन ला साजेशी व सूट होणारे आणि खिशाला देखील परवडणारे अशा कॉस्मेटिक्सची भारतात प्रचंड प्रमाणात गरज आहे हे ओळखून ही गरज पुरवत असताना शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे विनिता सिंग यांनी.
बहुप्रतिष्ठित व भारतातील प्रथम क्रमांकाच्या आयआयएम अहमदाबाद इथून आपले एमबीए चे शिक्षण पूर्ण करून विनिता ला एका आंतरराष्ट्रीय बँकेमध्ये तब्बल एक कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी कॅम्पस प्लेसमेंट मधूनच मिळाली होती. पण मुळातच स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करायचा या विचाराने तिनी स्वप्नवत अशी ही नोकरी नाकारली. अवघ्या २३ व्या वर्षी इतका मोठा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल परिवार मित्र गण यांच्याकडून कटू शब्द विनिताला ऐकावे लागले पण आज हीच विनिता आपल्या बुद्धिमत्ता व व्यवसायातील ज्ञानाच्या आधारावर शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे.
स्वतः एक महिला असल्याने नेमकं भारतीय महिलांची सौंदर्यप्रसाधनान कडून असलेल्या अपेक्षांबाबत तिला चांगलीच कल्पना होती. त्यात कॉस्मेटिक्स ची क्वालिटी, त्वचेवर होणारे परिणाम व किमती या तीनही गोष्टींची योग्य ती सांगड घालून जर महिलांना आणि विशेष करून तरुण पिढीतील महिलांना पुरविण्यात आले तर यातून नक्कीच यशस्वी व्यवसाय निर्माण होऊ शकतो या विश्वासाने तिने कॉस्मेटिक्स च्या या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
एमबीएला सोबत शिकत असलेला कौशिक मुखर्जी हा देखील विनिता च्या या व्यवसायात व पुढील आयुष्याचा देखील भागीदार बनला. विनिताला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसाय करायचा होता तर कौशिक ला मात्र ई-कॉमर्स मध्ये अधिक रुची होती. आणि हे दोघेही एकत्र आल्यानंतर या दोन्ही व्यवसायाच्या कल्पनादेखील एकत्र करून “शुगर कॉस्मेटिक्स” नावाची कॉस्मेटिक्स ई-कॉमर्स कंपनी दोघांनी सुरू केली. २०१२ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
अतिशय काळजीपूर्वक व भारतीय वातावरणाला व महिलांना सूट होणाऱ्या विशेष सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती विनिता यांनी करवून घेतली. सर्वच अंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक्स च्या प्रोडक्स मध्ये काय त्रुटी आहेत याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून मगच शुगर कॉस्मेटिक्स च्या प्रोडक्स ची निर्मिती करण्यात आली. आज शुगर साठी जर्मनी, चीन सारख्या ६ देशांमध्ये उत्पादन केले जात आहे.
किमतींबाबत देखील अतिशय सतर्कतेने निर्णय घेण्यात आले. उदा. लिपस्टिक ह्या बाजारात रु १५० ला होत्या नाहीतर सरळ रु १४०० पासून पुढे होत्या. तेव्हा शुगर कॉस्मेटिक च्या लिपस्टिक ह्या रु. ५०० ते रु ७०० च्या दरम्यान असतात.
जसे ही प्रसाधने विशिष्ट होती तसेच याचे डिझायनिंग व पॅकेजिंग देखील तितक्याच नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले. विनिता व कौशिक या दोघांनीही सुरुवातीला ठरविल्याप्रमाणे आज पर्यंत देखील शुगर कॉस्मेटिक्स ला कोणीही ब्रांड एंबेसडर नाही.
शुगर कॉस्मेटिक्स चे प्रॉडक्ट ही स्वतःच्या वेबसाईटवर तर विक्रीसाठी उपलब्ध होतेच पण त्यासोबतच ॲमेझॉन व नायका सारख्या अनेक कंपन्यांच्या ई-कॉमर्स पोर्टल वर देखील विक्रीस ठेवण्यात आले होते. पण जोपर्यंत ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल ची माहिती मिळत नाहीत तोपर्यंत तुमचे प्रॉडक्ट ऑर्डर करणारच कोण?
कुठल्याही व्यवसायाचा सगळ्यात मोठा खर्च हा मार्केटिंग व जाहिरातीसाठी लागत असतो. पण मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड सोबत स्पर्धा करत असताना कमीत कमी खर्चा मध्ये आपली जाहिरात कशी होऊ शकते याचाच विचार करणं त्यांना महत्त्वाचं होतं. आणि यासाठी त्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रकार शोधून काढला. तो म्हणजे अफिलिट मार्केटिंगचा. म्हणजे युट्यूब व इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर आज अनेक लोक आहेत ज्यांच्या दर्शकांची संख्या ही लाखों मध्ये आहे.
ज्यावेळेला हि लोक एखाद्या प्रॉडक्ट विषयी स्वतःहून माहिती देतात व त्यांच्या चॅनलवर या प्रॉडक्टची लिंक देखील देतात तेव्हा स्वाभाविक रित्या त्या प्रॉडक्टची विक्री वाढीस लागते. आणि हाच मार्ग सुरुवातीला विनिता व कौशिक यांनी स्वीकारला.
अफिलिएट मार्केटिंग सुरू करताच अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्या पुढच्या ऑर्डर या अनेक पटीने वाढू लागल्या. कंपनीचा टरणोवर बघता बघता अनेक कोटींपर्यंत पोहोचला. २०१२ ते २०१५ या अवघ्या तीनच वर्षांमध्ये कंपनीची उलाढाल ही ५० कोटी रुपयांहून अधिक वर पोहोचली होती.
२०१५ मध्ये ए नाईन्टी वन या व्हेंचर कॅपिटल फर्मने ७० कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीमध्ये केली. या प्राप्त झालेल्या गुंतवणुकीवर आता कंपनीने आपल्या स्वतःच्या रीटेल आउटलेट सोबत काम करण्याचं ठरवलं. २०१५ मध्ये त्यांनी आपलं पहिलं रेटेल आउटलेट हैद्राबाद येथे सुरू केलं.
युट्यूब इंस्टाग्राम वरील केलेल्या जाहिरातीमुळे आजच्या तरुण पिढीला या प्रोडक्शन ची सहज भुरळ पाडली. शुगर कॉस्मेटिक्स च्या प्रोडक्स ची मागणी दिवसेंदिवस वाढत होती. आणि बघता बघता २०१९ पर्यंत कंपनीचे १९५ शहरांमध्ये आज आउटलेट उपलब्ध आहेत. प्रत्येक महिन्याचे उत्पन्न आता दहा कोटी रुपयांहून अधिक चे येऊ लागले आहे. केवळ १०० लोकांची टीम असलेल्या या कंपनीचे आज भारत भरात १७५० हून अधिक आउटलेट असून फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिंत्रा नायिका अशा अनेक ई-कॉमर्स पोर्टल सोबत देखील पार्टनरशिप आहे.
गुंतवणूकदारांकडून आत्तापर्यंत ३५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्राप्त झाली आहे. कंपनीच्या सध्याचे मूल्यांकन हे साडेसातशे कोटी रुपयांहून अधिक चे येत असून पुढील दहा वर्षात ते वीस पटीने वाढण्याची शक्यता ही तज्ञांकडून वर्तविली जात आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स कडून दिलेल्या स्टार्टअप ऑफ द इअर २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टार्टअप म्हणून अवॉर्ड प्रदान करण्यात आले आहे.
उत्तम दर्जा व मध्यम मूल्य या सूत्रावर काम करत विनिता व कौशल्य यांचीही शुगर कॉस्मेटिक्स चे कंपनी आज यशाचे नवनवीन शिखर पादाक्रांत करत आहे. आणि हे सर्व सुरू झालं ते एका धाडसी तेथे एका धाडसी निर्णयातून “नोकरी न करण्याच्या”…
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!