मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – चिकी चंक

by Gautam Sancheti
एप्रिल 5, 2021 | 1:01 am
in इतर
0

चिकी चंक

डिझायनर छत्रीचा व्यवसाय होऊ शकतो का, तर नक्कीच होऊ शकतो. हे सिद्ध केले आहे युवा उद्योजक प्रतीक दोशी याने. जाणून घेऊ या त्याच्या या भन्नाट स्टार्टअपची ही यशोगाथा….
Dr. Prasad Photo
प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
पावसाळा जवळ येऊ लागला की सगळ्यांना आठवण होते ती अडगळीत ठेवलेल्या छत्र्यांची. पण आजकाल पूर्वीसारखा आपल्या छत्री बद्दलची इतकी आपुलकी तितकं प्रेम, मुळात उरलंच नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण दरवर्षी आता चटकन एखादी काळी छत्री उचलावी किंवा लेडीज साठी असेल तर सिंगल कलर मधली छत्री उचलावी चार दोन महिने वापरावी आणि टाकून द्यावी, असा एक साधारण ट्रेंड भारतभर दिसत आहे.
पण केवळ या छत्रीची उपयुक्तता लक्षात न घेता छत्री ही जर फॅशनचे चिन्ह म्हणून वापरू लागले तर? डिझायनर कपडे, डिझायनर सूट, डिझायनर पादत्राणे या सर्व गोष्टी वापरण्याची पद्धत जरी जगभरात असली तरी डिझायनर छत्री वापरणं असं आपण क्वचितच ऐकलं असेल. अशाच आगळ्यावेगळ्या कल्पनेतून प्रतीक दोशी याने आपल्या डिझायनर छत्री यांचा मोठा व्यवसाय मांडला आहे आणि त्यातून दरवर्षाला पंधरा हजारहून अधिक छत्र्या तो भारतात विकत आहे. जाणून घेऊ या प्रतीक दोशी याच्या ‘चीकी चंक’ या भन्नाट स्टार्टअप बद्दल…
मुंबई येथे माटुंगा या क्षेत्रात लहानाचा मोठा झालेला प्रतीक हा आपल्या आजोबांना व वडिलांना त्यांच्या करोगेटेड बॉक्स बनवण्याच्या व्यवसायात काम करत असताना सतत बघत होता. आपले शालेय शिक्षण व पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीए पूर्ण केले. २०१४ मध्ये एमबीएची डिग्री प्राप्त केल्यानंतर त्याच्या समोर अनेक कंपन्यांमध्ये नोकरीचे पर्याय खुले होते. त्यातील एका उत्तम बड्या कंपनीमध्ये त्याने नोकरी देखील स्विकारली. पण पगार जरी उत्तम मिळत असला तरी दैनंदिन जीवनामध्ये त्याच कामाला तो फार पटकन कंटाळा.

CK7SwiEUYAoLb2o

आयुष्यात प्रत्येक क्षणी काहीतरी नाविन्यपूर्ण अनुभवता आलं पाहिजे आणि त्यातून वैयक्तिक व सामाजिक उत्कर्ष देखील घडवून आणता आला पाहिजे. या विचाराने त्याने अतिशय कमी कालावधीमध्ये बड्या पगाराची मिळालेली ही नोकरी चटकन सोडली. नोकरी सोडल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. घरच्यांकडून जरी आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये प्रतीकने जॉईन व्हावं अशी इच्छा व्यक्त होत असली तरी देखील प्रतीकने मात्र स्वतःचा जगावेगळा मार्ग निर्माण करायचं ठरवलं होतं.
लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय करावा या उद्दिष्टाने त्याची चौफेर नजर सतत मार्केटचा व विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करत असे. आणि हीच सवय त्याला भावी आयुष्यात देखील कामास आली. नोकरी सोडून व्यवसाय करायचा पण कुठल्या गोष्टीचा व्यवसाय आपल्याला करता येईल आणि त्यात यश मिळेल याबद्दल त्याचे विचारचक्र सुरू असताना त्याने एक विचार मात्र केंद्रस्थानी ठेवला. दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तूंचा व्यवसाय करायचा जेणेकरुन त्याची मागणी ही आयुष्यभर टिकून राहते व लोक स्वतःहून तुमच्याकडे ती वस्तू विकत घेण्यासाठी येतात.
आज काल एक नवीन ट्रेंड आला आहे दैनंदिन जीवनातील वस्तूच सर्वसामान्य पद्धतीने वापरल्या जातात त्याच देखील एका विशिष्ट पद्धतीने ब्रँडिंग व डिझायनिंग करून त्या प्रीमियम किमती मध्ये विकता येतात. याचे उदाहरण आपण पाहू शकतो चहा हा गल्लोगल्ली मिळणारा चहा आज मात्र त्याचे ब्रँडिंग केले गेले असून मोठ्या फ्रॅंचाईजी देखील या चहा चे नाव अमृततुल्य करून दिल्या जात आहेत.
अशाच पद्धतीने काही करावं हा विचार प्रत्येकाच्या मनात असताना भर उन्हाळ्यामध्ये त्याने मुंबईतील रस्त्यांवर लोकांना छत्री घेऊन फिरताना पाहिलं. आणि ती छत्री पाहून प्रतीकला आपण छत्री यांचा व्यवसाय करू शकतो का असा प्रश्न पडला. या प्रश्नावर ती त्यांनी अतिशय गांभीर्याने विचार केला आणि छत्री कुठल्या पद्धतीने कशाप्रकारे विकली तर त्याला आपल्याला उत्तम मूल्य मिळेल आणि एक मोठा व्यवसाय यातून निर्माण होऊ शकेल.

CkpqhkGUUAEQ 6f

प्रत्येक जण आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन आपल्यातील कलाकाराला वाव दिला. त्याने स्वतःलाच छत्र्यांचा केवळ काळा रंग कसा असावा किंवा डिझाईन असल्या तरी अगदी विशिष्ट पद्धतीच्या डिझाईन्स असाव्या असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. आणि काही विशिष्ट पद्धतीने डिझाईनर छत्र्या बनविण्याचा निर्णय त्याने नक्की केला. सुरुवातीला काही डिझाईन त्यांनी स्वतः तयार केले. यासोबतच छत्री बनवण्यासाठी लागणारे कापड त्यातील तारा त्याचा रोड त्यात असलेल्या स्प्रिंग या सर्व साहित्याची देखील एका बाजूने त्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. हे उत्पादन मोठ्या प्रमाणात करायचं म्हटल्यावर ती ते स्वतः एकट्याने करून चालणार नाही व त्याकरता लागणारी मॅनपावर सध्या परवडणारी नाही हे लक्षात घेऊन छत्री बनविण्याचे काम आउटसोर्स करण्याचा निर्णय त्याने घेतला.
आहे सगळं करण्यासाठी लागणार होता ते भांडवल आणि नुकतेच नवी लागलेली नोकरी चटकन सोडली असल्याकारणाने फारशी पुंजी त्याच्याकडे जमलेली नव्हतीच. पण होतकरू तरुणांना कधीही कुठलीही अडचण फार काळ अडवून ठेवू शकत नाही आणि असाच झालं आपल्या महाविद्यालयीन जीवनात असताना प्रतीकने इतर विद्यार्थ्यांचे ट्युशन्स घेऊन तब्बल 1 लाख 35 हजार रुपये जमा केले होते. आणि हाच पैसा त्याला त्याच्या व्यवसायाचे पहिले भांडवल म्हणून कामी आले.
प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करणं ही कधीही आणि कोणालाही सहज सुलभ झालेलं नाही तर प्रत्येक त्यास अपवाद कसा ठरावा? आधीच नोकरी सोडली असल्याकारणाने त्यावर नातेवाईक मित्र व इतर संबंधित लोकांकडून व अप्रत्यक्षरित्या टीका होत होती. करण वेलिंगकर सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून एमबीएची डिग्री प्राप्त केल्यानंतर किमान बारा लाखाचं पॅकेज उत्तर अगदी सहज मिळतं अशी समाज असताना एखादी वेगळी वाट घेऊन त्यावर प्रवास करणं हे समाजाला फार रुचणार नव्हतं. आणि त्यात हा आगळावेगळा व्यवसाय छत्र्या बनवून विकण्याचा…
छत्र्या बनवून विकण्याचे काम तर रस्त्याच्या कडेला बसलेला एखादा विक्रेता देखील करतो मग यात प्रतीक नवीन असं काय करणार आहे अशा प्रकारची थट्टा ही लोकांकडून होऊ लागली. आणि ही सर्व टीका प्रतीक्षा कानावर देखील येत होती पण अशा कुठल्याही टीकेला किंवा निंदेला घाबरून प्रतीक चा प्रवास थांबला नाही. कारण त्याचे उद्दिष्ट स्पष्ट होतं किंबहुना या सर्व टीकेला त्याला उत्तर द्यायचं होतं ते आपल्या यशातून. आणि म्हणून प्रतीक अविरतपणे आपलं काम करत राहीला.
अनेक प्रकारच्या डिझाइन्स प्रतीकने स्वतः तर तयार केल्यास पण इतर काही फ्रीलान्सर डिझायनर्स कडून देखील तयार करून घेतल्या.  या विविध डिझाइन्सच्या ४०० छत्र्या पहिल्याच खेपेत बनवण्याचा निर्णय त्याने घेतला. हे सर्व करत असताना वेगवेगळे सप्लायर, व्हेंडर व कारागीर यांच्याशी त्याचा संबंध आला. आणि या प्रत्येक भेटीतून प्रत्येक संबंधातून तो काहीतरी नवीन शिकत होता. अनेक जणांनी त्याला फसविले देखील बाजारभावापेक्षा देखील जास्त किंमत ही त्याच्याकडून घेतली पण हा प्रत्येक अनुभव त्याला एक धडा देऊन जात होता.
जून महिन्याला सुरुवात झाली होती, साल २०१५. अगदी योग्य वेळ होती. छत्र्यांचा व्यवसाय सुरु करण्याची. तयार करवून घेतलेल्या सर्व ४०० छत्र्या या त्याने आपल्या वडिलांच्याच फॅक्टरीमध्ये साठवून ठेवल्या होत्या. या चारशे छत्र्या प्रतीकने ॲमेझॉन फ्लिपकार्ट व इतर ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी ठेवल्या. आणि या सोबतच मुंबईतील किरकोळ दुकानदार यांच्याकडे देखील आपल्या छत्र्या उपलब्ध करून दिल्या. सर्व छत्र विक्रीला ठेवून अनेक दिवस उलटून गेले पण एकही छत्री विकली जात नव्हती. अखेर प्रतीकला आता मात्र आपल्या व्यवसायाबद्दल भीती वाटू लागली. आपल्याकडे होतं नव्हतं ते सर्व भांडवल त्याने या व्यवसायामध्ये गुंतवलं होतं आणि त्यातून एक रुपयाचा देखील उत्पन्न अजूनही निर्माण झालं नव्हतं.
अखेर आपणांस आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करावा असा विचार करून प्रतीकने आपल्या काकांनाच ॲमेझॉन वरून आपल्या पहिल्या छत्रीची खरेदी करण्याची विनंती केली. आणि प्रतीकच्या काकांनी तसं केलं देखील. यामुळे भरतीच्या व्यवसायाचा भोपळा फुटला होता. पण जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते असं म्हणतात ते काही चुकीचे नाही. या प्रसंगाचे दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये इतका जोरदार पाऊस झाला की त्याचा परिणाम स्वरूप प्रतीकच्या काकांच्या एका दिवसात ४० छत्र्या विकल्या गेल्यात.
ॲमेझॉन वरून खरेदी केलेली प्रतीकची छत्री ही ॲमेझॉन वरच्या छत्र्यांच्या सेगमेंट मधील वीस नंबरच्या पानावर होती. पण अवघ्या काहीच दिवसात जसा पावसाळा जोर धरू लागला तशी प्रतीकच्या छत्र्यांची जाहिरात आता पहिल्या पानावर येऊन ठेपली होती. आणि केवळ दीड महिन्यांमध्ये ही छत्री ॲमेझॉन बेस्टसेलर म्हणून नामांकित करण्यात आली होती.

CK wtm VEAA8tRM

याबद्दल प्रतीक सांगतो की, केवळ तुम्ही केलेली जाहिरात महत्त्वाचे नसते तर त्या जाहिरातीला पूरक लोकांनी एकमेकांना ती वस्तू विकत घेण्यास भाग पाडणे महत्त्वाचे असते. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर आवडते व तो दुसऱ्याला तू ही घे असा आग्रह करतो. आणि हीच खर्‍या अर्थाने तुमच्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेची पावती होय.
सुरुवातीला तयार केलेल्या चारशे छत्र्या या अवघ्या दीड महिन्यांमध्ये विकून संपल्या होत्या. आणि तोपर्यंत पावसाळा देखील सरत आला होता.  त्यामुळे आता पुन्हा लगेच गुंतवणूक करावी की नाही काही लोकांचे टोमणे ऐकू आले. “चला आता टाईमपास पुरे झाला पुन्हा नोकरीला लागा.” आणि ही गोष्ट प्रतीकला खरंच चाटून गेली माझा व्यवसाय हा केवळ पावसाळा पुरता मर्यादित नसून आणि केवळ एकदाच करण्याचा टाईमपास नसून याचं स्वरूप एका मोठ्या कंपनीमध्ये मला करायचा आहे. आणि या जिद्दीच्या जोरावर प्रतीकने आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन २०१५ मध्ये चीकी चंक या नावाने केले. आलेला पैसा जरी तुटपुंजा असला तरी यातून त्याने नवीन डिझाइन्स निर्माण करण्याकडेच भर दिला. आता त्यांनी वेगवेगळ्या थीम्स च्या छत्र्या बनवायला सुरुवात केली. त्यात काही आम्ही मुंबईकर काही बॉलीवूड काही भारतीय अशा विविध थीम्स वर आधारित छत्र्यांचे डिझाइन्स निर्माण करणे व ते प्रिंट करून घेणे यावर ती प्रतीकने वर्षभर मेहनत घेतली.
आपल्या उत्पादनाची मागणी वाढवण्याकरता छत्री हा केवळ पावसाळ्यातच वापरायचा प्रॉडक्ट नाही तो तुम्ही उन्हाळ्यात व किंबहुना वर्षभर देखील वापरू शकता हे बिंबवण्यासाठी प्रतीक ने अनेक प्रयत्न केले. अनेक फिल्म सेलिब्रिटींना प्रतीक ने विशिष्ट डिझायनर छत्र्या भेट दिल्या. व त्या सेलिब्रिटीज ने देखील त्या आनंदाने स्वीकारल्या व वापरल्या. आणि ह्यामुळे प्रतीच्या छत्र्यांची बिनबोभाट जाहिरात बिनभांडवली होत होती. छत्रिय वस्तूचं आता रिपोझिशनिंग करण्यात आलं. म्हणजे छत्री केवळ त्याच्या उपयुक्त ते साठी न वापरता ती एक फॅशन ची वस्तू आहे हा विचार प्रचलित करण्याचं काम प्रतीकने केलं.
हे सर्व करत असताना त्याने आपल्या पुढील वर्षासाठी च्या छत्रे यांचं नवीन डिझाईन सह उत्पादन देखील पूर्ण करवून घेतलं. नावीन्यपूर्ण डिझाईन सोबतच कंपनीच्या यशाचे एक मोठे रहस्य म्हणजे अतिशय माफक किंमत. कंपनीच्या सर्व छत्र्यांच्या किमती या केवळ रु. ४९९ पासून रु. ६९९ इतक्याच आहेत त्यामुळे सामान्य लोक देखील डिझाईनर छत्र्यांचा वापर सहजरित्या करत आहेत.
आणि ह्याचा अपेक्षित परिणाम प्रतीकला पुढच्या उन्हाळ्या पासूनच पाहायला मिळू लागला. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होता क्षणी प्रतीकच्या क्षेत्रांची मागणी दिवसाला चारशे इतकी प्रचंड प्रमाणात वाढली. हे सर्व करण्यासाठी आता प्रतीकला एकट्याने शक्य नव्हतं म्हणून त्यांनी सात जणांची टीम उभी केली. यात एक डिझायनर दोन मॅनेजर्स एक अकाउंट व इतर कामगार अशी टीम निर्माण केली. आणि ह्या वर्षी मात्र व्यवसाय इतक्या झपाट्याने वाढत होता किया सात जणांकडून देखील हा व्यवसाय पूर्ण मॅनेज होईना. केवळ दोनच महिन्यांमध्ये प्रतीकने तीस लाख रुपयांचा व्यवसाय केला होता.
या यशानंतर प्रतीक आपल्या निंदकांना खोचकपणे सांगतो जितके उत्पन्न एम बी ए दोन वर्षांमध्ये कमवतात ती माझ्या व्यवसायाच्या दोन महिन्याच्या उत्पन्न इतकेच होते.

CLnwJgGUAAAv65Y

चीकी चंक ची इतकी उत्तुंग वाटचाल पाहून अनेक गुंतवणूकदारांकडून स्वतःलाच प्रतीक ला गुंतवणूक देण्याची ऑफर केली. २०१६-१७ मध्ये तब्बल ४० हजार डॉलर्सची गुंतवणूक या कंपनीला प्राप्त झाली. आणि पुढच्या वर्षीच आणखी काही बडे गुंतवणूकदारांकडून एक मोठी रक्कम गुंतवणूक म्हणून या कंपनीला देण्यात आली. आता आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम झालेल्या कंपनीने स्वतःची वेबसाईट व स्वतःचे ॲप देखील लॉंच केले. त्यामुळे कंपनीची विक्री वाढायला मोठ्या प्रमाणात मदत झाली.
आज कंपनी भारत भरात आपल्या छत्र्यांची विक्री करत असून वार्षिक उलाढाल ही कोट्यवधी रुपयांमध्ये गेली आहे. कंपनीने आपल्या प्रोडक्ट चा विस्तार देखील केला असून केवळ छत्र यापुरते सीमित न राहता आता वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट प्रिंट मग फोटो फ्रेम्स, घड्याळ इत्यादी अनेकविध डिझायनर वस्तूंमध्ये आज ही कंपनी व्यवसाय करत आहे. आज कंपनीकडे तीनशेहून अधिक वेगवेगळी डिझायनर्स जोडलेले असून प्रत्येक डिझाईन साठी कंपनी हजार रुपयांपासून १० हजार रुपये प्रति डिझाईन इतकी किंमत देखील देत आहे. अशा या आगळ्यावेगळ्या व्यवसायाची वाटचाल यशोशिखर आकडे अतिशय गतिमान पद्धतीने सुरू आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाबाधित डॉक्टरचा पुरलेला मृतदेह बाहेर काढा; हायकोर्टाचे आदेश

Next Post

अभिनेता अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती; कोरोनाचा रिपोर्ट कालच आला होता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, २६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0362 e1756133644221
संमिश्र वार्ता

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओची अचानक भेट…चार कर्मचारी अनधिकृत गैरहजर, कारणे दाखवा नोटीस

ऑगस्ट 25, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत ट्रान्सनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटच्या प्रमुखाला केली अटक

ऑगस्ट 25, 2025
गणपती e1756131291560
संमिश्र वार्ता

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना…

ऑगस्ट 25, 2025
Nashik city bus 6 e1723473271994
स्थानिक बातम्या

सिटीलिंकची दोन नवीन मार्गांवर बससेवा सुरु…असे आहे वेळापत्रक

ऑगस्ट 25, 2025
manse1
संमिश्र वार्ता

मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची केली पक्षातून हकालपट्टी

ऑगस्ट 25, 2025
निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Next Post
akshay

अभिनेता अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती; कोरोनाचा रिपोर्ट कालच आला होता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011