इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – बी लाईव्ह
मूळचा गोव्याचा असलेला समर्थ खोलकर लहानपणापासूनच गोव्यातील पर्यटन व्यवसाय आणि त्याची बदलती रुपं अतिशय जवळून पाहात होता. स्वतः समर्थ चे आई-वडील प्रत्यक्षरीत्या जरी कुठल्याही पर्यटन व्यवसायामध्ये नसले तरी देखील अवतीभवती सर्वत्रच पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक कुटुंब त्याने पाहिले होते आणि त्यांच्या व्यवसायाचे वाढते प्रमाण आणि होणारे बदल याचा तो बारकाईने अभ्यास करत होता.

(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
पुणे विद्यापीठातून सिविल इंजीनियरिंग ची पदवी संपादन केल्यानंतर कॅट या एम बी ए एंट्रन्स एक्झाम मध्ये उत्तम गुण मिळवून गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये एमबीएला प्रवेश मिळवला. व्यवस्थापनाचे धडे व्यवस्थितरीत्या गिरवल्यामुळे आयबीएम या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला लगेच नोकरी मिळाली. सलग सहा वर्षे या कंपनीमध्ये बंगलोर येथे काम करत असताना त्याने दोन प्रमोशन्स देखील पटकावले. नोकरी जरी उत्तम असली तरी स्वतःचं काहीतरी करण्याची खुमखुमी नेहमीच समर्थच्या मनात होती. आणि या विषयी तो आपल्या अनेक मित्रांसोबत चर्चा देखील करत असे.
एमबीए ची तयारी पुण्यात करत असताना त्याला भेटलेला एक मित्र संदीप मुखर्जी हा देखील आपले व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण करून मायक्रोसोफ्ट सारख्या बड्या कंपनी मध्ये नोकरी करत होता. याच कंपनीकडून संदीपला परदेशात देखील एका प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली होती. आणि हे प्रोजेक्ट होतं इलेक्ट्रिक वेहिकल्सचं.
एकदा समर्थ आणि संदीप चर्चा करत असताना असा कुठला व्यवसाय आहे जो आपण दोघं मिळून करू शकतो असा विषय सुरू होता. तेव्हा समर्थ ने आपल्या गोवा राज्यातील पर्यटन व त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधी याबद्दल संदीपशी चर्चा केली. तेव्हा समर्थ चे गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील ज्ञान आणि संदीप कडे असलेले इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दलचे कौशल्य या दोन्ही गोष्टी कम्बाईन करून एक भन्नाट व्यवसाय निर्माण होऊ शकतो असं दोघांच्याही लक्षात आलं.
खरं तर दोघांनी ही वयाची 36 गाठली होती. दोघांचाही विवाहदेखील झाला होता आणि या वयाला साजेशा अशा सर्वच जबाबदाऱ्या दोघांच्याही खांद्यावर होत्या. दोघेही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करून उत्तम पगार मिळवत होते. आणि आयुष्याच्या या टप्प्याला येऊन आपली नोकरी सोडून एखादा व्यवसाय शून्यातून निर्माण करणे म्हणजे अतिशय धाडसाचं काम होतं. आणि त्यामुळेच प्रत्येक पाऊल हे अतिशय विचारपूर्वक टाकावे लागणार होतं याची दोघांनाही कल्पना देखील होती. तरीदेखील त्यांनी हे पाऊल उचलायचं ठरवलं.
यासाठी सर्वप्रथम ते मी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसमोर सर्वच प्रश्नांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. अनेक पर्यटकांशी चर्चा केल्यानंतर व त्याचे अनालिसस केल्यानंतर त्यांना काही प्रमुख मुद्दे लक्षात आले, ते असे.

गोवा हे मुख्यतः पर्यटन स्थळ असलात तरी येथे येणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन हा एककल्ली असतो म्हणजे गोव्याला जायचं तिथला बीच वरील एखाद्या शर्ट मध्ये आराम करायचा मध्यपान करायचं पार्टी करायची संगीतावर बेधुंद होऊन नाचायचं आणि बीच लगतच्या रेतीवर पडून रहायचं इतकच.
गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचे स्वतःचेच एक कल्चर निर्माण झालं आहे त्यामुळे गोवा वासियांच्या संस्कृतीचा अभ्यास करणे व ते जाणून घेणं यापासून अनेकदा पर्यटक दूरच असतात.
गोव्यात फिरण्यासाठी तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी गाड्या या भाडेतत्त्वावर मिळतात आणि अनेक पर्यटक हेच पसंत करतात. यामुळे गोव्यातील प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे याचा विचार होत नाहीये.
गोव्यातील पर्यटन व्यवसाया समोरील या सर्व प्रश्नांचा विचार करता त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. गोव्यात येणार्या पर्यटकांना खर्या गोव्याची व गोव्यातील संस्कृतीची आणि निसर्गाची खरी ओळख करवून देणं आणि या सोबतच पर्यावरणाचे संगोपन देखील करणं हे सर्व उद्दिष्ट एकाच व्यवसायातून साध्य करणे यासाठी त्यांनी एका प्रोजेक्टवर काम सुरू केलं.
यासाठी त्यांनी बाईक्स म्हणजे इलेक्ट्रिक बाइक्स खरेदी केल्या. सुरुवात 30 बाइक्स पासून करण्यात आली. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी “बी लाइव्ह” या नावाने आपल्या पहिल्या “इ टुरिझम” कंपनीची स्थापना केली. ह्या कंपनीद्वारे त्यांनी सुरुवातीला गोव्यात प्रमुख पाच ई बाइक टूर्स देण्यास सुरुवात केली. ह्यात पर्यटकांनी सहसा न पहिल्या गोव्याच्या भागांची निवड त्यांनी केली. ज्या वेगवेगळ्या टूर्स मध्ये काही टूल्स केवळ निसर्ग पर्यटनासाठी काही संस्कृती जाणून घेण्यासाठी तर काही टूर्स केवळ खवय्यांसाठी खाद्यसंस्कृतीवर आधारित अशा डिझाइन करण्यात आल्या. प्रत्येक टूर ही साधारण दोन ते तीन तासांपर्यंत असते. जे टू वर मच्छी पर्यटकांना इलेक्ट्रिक बाइक देण्यात येतात या इलेक्ट्रिक बाइक चे डिझाईन एका विशिष्ट पद्धतीने तयार करून घेण्यात आले आहे ज्यामुळे या बाईक चा वापर इलेक्ट्रिक मोटर वर देखील होतो व पेडल करून सायकल सारखा देखील या वापरता येतात. गोव्यातील एका टूरचे प्रवास भाडे साधारण 1500 ते 2000 रुपये इतके प्रतिव्यक्ती ठेवण्यात आले आहे.










