कागद स्कॅनर
आज आपण खरोखर भन्नाट अशा स्टार्टअपची माहिती घेणार आहोत. मोबाईल फोन हा अतिशय गरजेचा बनलेला आहे. याच मोबाईलमध्ये स्कॅनरचे काम करणारे अॅप तयार करुन या तरुणांनी मोठीच मजल मारली आहे. याच अनोख्या उद्योगाची ही यशकथा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी…

(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
अनेक ऑफिसेस मध्ये कागद स्कॅन करण्यासाठी मोठे स्कॅनर वापरण्याऐवजी आजकाल मोबाईल मधील कॅम स्कॅनर वापरण्याचा ट्रेंड आला आहे. बहुतांशी ठिकाणी वापरले जाणारे हे कॅम स्कॅनर हे एक चायनीज ॲप्लिकेशन आहे याची बऱ्याच जणांना कल्पनाही नाही.
भारत-चीन सीमेवरील तणाव लक्षात घेता व इतर काही आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी मुळे भारतात चायनीज ऍप्स वर बंदी घालण्यात आली होती. पण बंदी घालण्यात आलेल्या प्रत्येक आपलाच भारतीय पर्याय पर्याय उपलब्ध असेलच असं नाही.
केम स्कॅनर या चायनीज आपला देखील भारतीय पर्याय उपलब्ध नव्हता. पण गुरगाव हरियाणा येथील या तीन तरुणांनी अवघ्या काही दिवसातच “कागज स्कॅनर”हे ॲप डेव्हलप करून भारतीयांना फार मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नाची दखल केंद्र सरकार कडून देखील घेण्यात आली असून आत्मनिर्भर ॲप च्या यादीमध्ये या ॲपचा देखील समावेश सरकारकडून करण्यात आला आहे.
स्नेह सुगंधी गौरव श्रीश्रीमाळ या दोघांनी 2019 मध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. ओरडेनेडो लॅब्स असं नामकरण देखील कंपनीच करण्यात आलं. ह्या कंपनी अंतर्गत त्यांनी ताप मी नावाच्या घरगुती सुविधा पुरवणाऱ्या एका आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर आधारित ऍप ची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

स्नेहअंशू ने 2007मध्ये आयआयटी मुंबई येथून इंजिनियरिंग पूर्ण करून 2012 मध्ये आय एस बी हैदराबाद येथून एमबीए पूर्ण केले. गौरव हा आयआयटी कानपूर येथून झालेला इंजिनियर. या दोघांच्या कंपनीमध्ये तमंजीत बिंद्रा याला चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून नोकरी देण्यात आली होती. बिंद्रा हादेखील पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आपली पदवी घेऊन बाहेर पडला होता.
एकदा स्नेहानशु स्वतः आजारी पडल्यामुळे त्याच्या घरातील महत्वाचे कागदपत्र हे त्याच्या पत्नीला किंवा आई-वडिलांना देखील सापडणे अवघड झाले होते. आणि म्हणूनच त्याने एका पर्सनल असिस्टंट ॲप ची कल्पना आपला मित्र गौरव याला सांगितली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित एक पर्सनल असिस्टंट असावा ज्यात सर्व प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून सेव्ह करून ठेवावेत. व वेळप्रसंगी त्या ॲप नाही तुम्हाला एका क्लिक मध्ये सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध करून द्यावे. यासोबतच त्या डॉक्युमेंट्स संदर्भात येणारे सर्व नोटिफिकेशन्स अपडेट्स सर्व तो ॲप मॅनेज करेल.
याच कामामध्ये हे तिघेही जण लागलेले असताना त्यांना एक अडचण येत होती आणि ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दुसऱ्या एका ॲपच्या सहाय्याने ते स्कॅन करून मग ते ह्या ॲपमध्ये अपलोड करावे लागत होते. या दोन एप्स इंटिग्रेशन करण्यास त्यांना फार त्रास होत होता आणि म्हणून याच ॲप मध्ये त्यांनी स्कॅनिंग ची ही सुविधा देण्याचा विचार झाला.
पण त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वोकल फोर लोकल चे आवाहन केले आणि त्वरित या तिघांनी आपल्या आधीच्या प्लॅनमध्ये बदल घडवून आणला. त्यांना अपेक्षित असलेले पहिले ॲप चे काम थांबवून आता केवळ भारतीय बनावटीचे स्कॅनिंग ॲप तयार करण्याचं उद्दिष्ट त्यांनी हाती घेतलं. भारतीय बनावटीचा चांगल्या प्रतीचा स्कॅनिंग ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपला मोर्चा केवळ स्कॅनिंग ॲप डेव्हलपमेंट कडे वळवला. ॲप भारतीय असावं व त्याची खूण त्या एकच्या नावातूनच पटावी म्हणून त्यांनी आपल्या स्कॅनिंग ॲप ला कागज स्कॅनर असे नाव दिले.









