सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – हातगड

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 27, 2021 | 6:24 am
in इतर
0
IMG 2447

प्राचीन गडावशेषांचं ऐश्वर्य लाभलेला ‘हातगड’

सुरतेकडून नाशिककडे येणारा सर्वांत प्रमुख मार्ग हा सापुतारा घाटातून वर येतो. सापुतारा घाटमाथ्यावर महाराष्ट्रात प्रवेशताच आपलं स्वागत करतो तो म्हणजे ‘हातगड’ किल्ला. नाशिकच्या सह्यपर्वतरांगेच्या सातमाळा उपरांगेची सुरुवात होते ती दुर्ग हातगडपासून.
कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
सापुतारा हे हिलस्टेशन म्हणून प्रसिद्ध असलं तरी त्यापेक्षाही अधिक उंची असलेला हातगड किल्ला आणि परिसर आज पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेला दिसून येतो. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात येणारा हातगड किल्ला आपल्याला लांबून बघतांनाच आपल्या प्राचीनत्वाची ओळख करून देत दिमाखाने उभा आहे. एका समृद्ध किल्ल्यावर आढळतात तसे प्राचीन अवशेष लाभलेला हा किल्ला पर्यटकांबरोबरच गिर्यारोहकांनाही कायमच खुणावत असतो.
पायथ्याच्या हातगडवाडीतून हा किल्ला सोपा आणि आटोपशीर चढाईचा आहे. नाशिक- वणी- सापुतारा रस्त्यावर सापुतार्‍याच्या साधारण सहा किलोमीटर अलीकडे हातगड गाव लागतं. गावालगतच पाठीराख्यासारखा उभा आहे तो हातगड किल्ला. वणीकडून सापुतार्‍याकडे जाणार्‍या भरपूर बसेस, खाजगी वाहनं आपल्याला इथपर्यंत आणून सोडतात.
हातगडवाडीत पेशवेकालीन घोड्यांची पागा तसेच पाण्याचे कुंड बघायला मिळतात. गावात हनुमान, शंकर, देवीच्या मंदिरांबरोबरच मशिदही आहे. पर्यटनाच्या अंगाने सुसज्ज असलेली अनेक मोठाली हॉटेल्स आणि रिसोर्टस् हल्लीच हातगडगावाभोवती झालेली आहेत.

IMG 2555

गावातून हातगड किल्ल्याकडे वर नजर मारल्यास आपल्याला किल्ल्याच्या कातळकड्यावर काही तटबंदी तसेच बुरूज उभे असल्यांचं दिसून येतं. हातगड किल्ल्यावर चढण्यासाठी पायथ्याच्या हातगडवाडीतून किल्ल्याच्या मधोेमध पोहोचण्यासाठी वनविभागाने गाडीरस्ता केलेला आहे. तसेच हातगडवाडीतून वर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही करण्यात आलेला आहे.
गाडीरस्ता जिथे संपतो तिथून गडमाथ्यावर जाण्यासाठी अगदी पंधरा-वीस मिनिटे पुरेशी. एकूण चार प्रमुख प्रवेशद्वारांमधून जाणारा कातळात कोरलेला बोळीसारखा अनोखा मार्ग आहे. प्रवेशद्वारावरील शरभ शिल्पं आणि शिलालेख विशेष बघण्यासारखे आहेत. पहिल्या प्रवेशद्वाराच्या टतटबंदीच्या बाहेरचा छोटा असा सपाट भाग स्थानिकांमध्ये राणीचा बाग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यापुढेच काही अंतरावर अडचणीत नुकताच सापडलेला एक अप्रकाशित शिलालेख आहे. हा शिलालेख महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरील शिलालेखांत देवनागरी भाषेतला सर्वांत मोठा शिलालेख आहे हे विशेष.
गणपती आणि हनुमंताच्या सुंदर मूर्ती प्रवेशमार्गावर आपल्याला दर्शन देतात. पहारेदाराच्या चौकी आणि भुयारी खोल्या चढाई मार्गात दिसून येतात. गड माथ्यावर सलग अशा तटबंदीतून बांधलेले अनेक बुरूज हातगड किल्ल्याला बळकट बनवतात. गंगा-जमुना या बारमाही टाक्यांबरोबरच अनेक पाण्याच्या टाकी आहेत. किल्लेदाराचे घर, पेशवेकालीन ध्वजस्तंभाबरोबरच अनेक वास्तू येथे प्राचीनत्व दर्शवितात. हातगडच्या पश्‍चिम बुरूजावर पीर बाबांचे ठिकाण आहे, तर त्यापासून अगदी काही अंतरावर शंकराची पिंड असलेले स्थान आहे.

IMG 2487

सर्व जातीधर्माचे लोक येथे दर्शनासाठी येत असतात. यावरून पूर्वीच्या काळापासून हातगडावर सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता दिसून येते. गडाचं उत्तरेकडील टोक निमुळतं होत गेलेलं आहे. या टोकावर पडकी तटबंदी आणि बुरूज याव्यतिरिक्त काहीच नाही. उत्तर टोकाची पाहणी करून पश्‍चिमेकडे जायचं त्या वाटेवर काही घरांची जोती आढळतात.
एवढं सगळं बघत असतांना दोन वास्तू हातगडाचं निराळेपण दाखवतात. धान्याचं कोठार म्हणून वापरली जाणारी एकांड्या बुरूजाच्या आकाराची इमारत तर आजही अगदी चांगल्या स्थितीत असलेला ‘मुदपाकखाना’ म्हणजेच स्वयंपाक घर. जिज्ञासूंनी या दोन वास्तू बघण्यासाठी तरी हातगडावर नक्कीच जायला हवं.
गडमाथ्यावर सहजतेने फिरण्यासाठी वनविभागातर्फे दगडी पायर्‍यांचा मार्ग बांधण्यात आलेला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य तसेच सातमाळा रांगेतल्या किल्ल्यांबरोबरच सर्वाधिक उंची असलेला साल्हेर किल्लाही हातगडावरून न्याहाळता येतो. सापुतारा हिलस्टेशनचा एरियल व्ह्युव हातगडावरून मनमोहक दिसतो.

IMG 2563 a

इतिहासात डोकावलं तर हातगडाचे अनेक धागेदोरे हाती लागतात. बुरहाने मासीर या अहमदनगर निजामशाहीचा इतिहास सांगणार्‍या ग्रंथात बुरहान निजामशहाने जिंकून घेतलेल्या एकंदर ५८ किल्ल्यांची यादी आहे. या यादीमध्ये ‘हाटका’ असा हातगडाचा उल्लेख असल्याचा दिसतो. यावरून सोळाव्या शतकाच्या कालावधीत हातगड हा अहमदनगर निजामशाहीच्या ताब्यात होता असं स्पष्टपणे दिसतं. पण त्याच दरम्यान इ.स. १५४७ मध्ये बागुलवंशीय राजा भैरवसेन याने तो निजामशहाकडून जिंकल्याचा उल्लेख किल्ल्यावरील शिलालेखात आढळतो.
इ.स. १६३५ मधील खान दौरान अल्लाहवर्दिखान ह्याच्या नेतृत्त्वाखाली बादशहा शहाजहानच्या आज्ञेनुसार चालविलेल्या मोहिमेत सातमाळा रांगेतील अनेक किल्ले मुघलांनी हस्तगत केले. त्याप्रमाणे या रांगेतील किल्ल्यांवर शिलालेख कोरलेले आहेत. यावरूनच अचला-अहिवंताच्या बाजूचा हातगड देखिल या काळात मुघलांच्या ताब्यात असावा असे जाणकारांचे मत आहे.
ब्रिटीश अधिकारी जॉन ब्रिग्ज् याने खान्देश भागातला स्वराज्य प्रांत ब्रिटीश अंमलाखाली आणण्याच्या अहवालात हातगड हा किल्ला पेशव्यांचे सरदार ढमढेरे यांच्या ताब्यात असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यावरून हातगड हा पेशवाईत मराठ्यांकडे होता हे नक्की होते.

IMG 2193

पेशवे दप्तरात हातगडाचे उल्लेख आढळतात. इ.स. १७५९-६० मध्ये हातगड परगण्याचा मोकासा द्रौपदीबाई टोकेकडे चालविण्याची आज्ञा, तसेच इ.स. अठराशे च्या आसपास हातगडाच्या मार्गावर शुभकर्णसिंग याने मोर्चेबंदी व परिसर लुटल्याबद्दलचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर इ.स. १८१८ मध्ये कॅ. ब्रिग्जस् याने हातगड ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यावर त्याने इथे भेट दिली. त्यावेळेस हातगडावर सैन्य नव्हतं. इ.स. १८२६ मध्ये ब्रिटीश अधिकार्‍यांच्या कमिटीने एक छोटं केंद्र म्हणून स्थानिक सैनिकांची एक तुकडी हातगडावर तैनात केल्याचा उल्लेख आढळतो. यावरून सुरतेकडून नाशिककडे येणार्‍या या घाटमाथ्यावरील हातगडाचं ब्रिटीशकाळातही किती महत्त्व होतं हे लक्षात येतं.
किल्ल्याची उंची – समुद्रसपाटीपासून १११४ मीटर (३६५३ फूट)
अंतर – नाशिक ते हातगड ७५ किमी, वणी ते हातगड ३५ किमी.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पश्चिम बंगालमध्येच ८ टप्प्यात मतदान का? आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण गरम

Next Post

थेट राज्यपालांशी झटापट ; पाच काँग्रेस आमदारांवर गुन्हा दाखल…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
स्थानिक बातम्या

मालेगावमध्ये चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या पात्रात फेकून बापाने स्वत:ही पाण्यात उडी मारत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

ऑगस्ट 24, 2025
IMG 20250824 WA0380 1
राज्य

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हे वक्तव्य

ऑगस्ट 24, 2025
Next Post
bangaru

थेट राज्यपालांशी झटापट ; पाच काँग्रेस आमदारांवर गुन्हा दाखल...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011