बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – त्रिंगलवाडी

फेब्रुवारी 13, 2021 | 5:21 am
in इतर
0
a scaled

त्रिंगलवाडी
संपूर्ण सह्याद्रीपर्वत रांगेत सर्वाधिक किल्ले बाळगून असलेला नाशिक जिल्हा गिरीदुर्गांचे विविधांग दाखवतो. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या घोटी-इगतपुरीच्या निसर्गमयी डोंगररांगेत आडबाजूला आणि एकांतात ध्यानस्थ बसलाय तो म्हणजे ‘दुर्ग त्रिंगलवाडी’…
कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
नाशिकहून मुंबई महामार्ग पकडला की घोटीचा टोल नाका ओलांडायचा. अगदी किलोमीटरभर पुढे गेलं की डाव्या हाताला टाके नावाचं गाव लागतं. टाके गावातून जाणारा रस्ता बळायदूरी-पारदेवी अशी गावं दाखवत थेट त्रिंगलवाडीला घेऊन जातो. टाके गावापासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावरच्या या त्रिंगलवाडी गावात मस्त धरण बांधलेलं आहे. तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगरांमुळे धरण कायम भरलेलं असतं. आजूबाजूची सर्व गावं त्यावर आपली तहान भागवतात आणि उत्तम शेतीही करतात. धरणाच्या भिंतीवरून पाण्यात पाहिलं की त्यात त्रिंगलवाडी किल्ल्याचं प्रतिबिंब तरंगतांना दिसतं. आता धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या वाडीपर्यंत थेट वाहन जाऊ शकतं.
वाडीभोवती पसरलेल्या शेताच्या बांधांवरील अवखळ पायवाटा त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दक्षिणेकडे खाली उतरलेल्या डोंगरधारेकडे जातात. किल्ल्याकडे तोंड करून उभं राहील्यावर आपल्या डाव्या हाताने वर जाणारी ही वाट अगदी सोप्या चढाईची आहे. मातकट मळलेली पायवाट थेट किल्ल्याच्या वरच्या उंच खडकाला जावून भिडते. हा उभा नैसर्गिक कडा गडमाथ्याला सुरक्षितता पुरवतो. त्यामुळे पूर्वी माथ्यावर जास्त तटबंदी बांधण्याची गरज नसायची. फक्त प्रवेशमार्गांवर चांगल्यापद्धतीने बांधकामं करून त्यावर पहारा आणि देखरेख ठेवणं सोपं जात असे. या कातळकड्यात एक भुयारी टाकं आहे. त्याठिकाणी शेंदूर फासलेल्या काही डोंगरदेवताही दिसून येतात. इथून वर जाण्यासाठी खोदीव पायर्‍या आहेत. सोपा सोपान पार केला की आपण गडमाथ्यावर आलेलो असतो.

d

असा आहे इतिहास
इतिहासाच्या बाबतीत त्रिंगलवाडी फार बोलत नाही. पण काही धागे मिळतात. कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आहे.
अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |
अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः ॥
इ.स.१६८८ मध्ये मुघलांनी फितुरी घडवून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. याबाबतीत मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या अर्जात तो म्हणतो (त्याचा अनुवाद), ‘सेवकाने किल्ले आउंधा, किल्ले कावनी, किल्ले हरीशगड, किल्ले त्रिंगलवाडी आणि किल्ले मोरंदर, मदनगड यांना वेढे घातले आहेत. परमेश्‍वर करील तर आपल्या कृपेने हे किल्ले मी अल्पावधीत जिंकून घेईल. किल्लेदारांना मी जी आश्‍वासने दिली आहेत, ती मान्य व्हावीत म्हणजे या सेवकावर त्यांचा विश्‍वास बसेल. जिंकून घेतलेल्या किल्लेदारांच्या नेमणूका व्हाव्यात. हशम आणि रसद पाठविण्यात यावी. म्हणजे किल्ल्याची समाधानकारक व्यवस्था होईल आणि त्यांच्या सुरक्षिततेची खातरजमा होईल.’
पुढे पेशवे काळात त्रिंगलवाडीचे उल्लेख सापडतात. इ.स. १७४४-४५ मध्ये बहिरजी बलकवडे यांस पेशव्यांचे पत्र आहे. ‘खंडनाक हिंमत भिकाजी केशव हशम यास गडकोटावर वाघाने मारले. त्याच्या आईस सालीना ७ रुपये’ असा उल्लेख त्यात आहे.

f

माथ्यावर हे आहे
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या माथ्यावर एक प्रमूख उंचवटा असून बाकी दक्षिणोत्तर निमूळते होत गेलेले पठार आहे. पठारावर अनेक पडक्या घरांचे अवशेष, घरांची जोती आणि भग्नावषेश पूर्वीच्या संपन्नतेची साक्ष देत विखूरलेले आहेत. माथ्यावरील खडकात पाण्याची काही टाकी आहेत. किल्ल्याच्या उत्तर टोकाला थोडं खालच्या टप्प्यावर एक मंदिर आहे. त्यात तीन कोरीव शिल्पमुर्ती आहेत. त्यात एक गणेश असून दोन महिषासूरमर्दिनी सारख्या देवीमूर्ती आहेत. पण स्थानिक लोक शंकर-पार्वती आणि गणेश म्हणून यांची पूजा करतात. गडदेवतांना नमस्कार करून माथ्यावरून दूरवरचा शिखरवेध घेतला असता. समोर पूर्वे कडे कळसूबाई तिच्या अलंग, मदन, कुरंग अशा दिग्गज साथीदारांबरोबर दर्शन देत असते. पलिकडे साधारण पश्‍चिमेला कसार्‍याच्या दुर्गम दर्‍या आवाज देत असतात. पश्‍चिमोत्तर भागातून नजर फिरविल्यास भव्य लॅण्डस्केपवर त्र्यंबकरांग पहूडलेली दिसते.
भूयार
माथ्यावरून खाली उतरण्यासाठी गडाच्या पश्‍चिमेकडच्या बाजूने एक मार्ग खाली उतरतो. वरून बघितलं तर एक मोठं भूयार असल्यासारखा भासणारा हा चौकोनी खड्डा म्हणजे खाली उतरण्याचा अनोखा मार्ग आहे. संपूर्ण प्रवेशद्वार, पहारेकर्‍यांची जागा आणि पायर्‍यांचा मार्ग, पायर्‍या सर्व कातळातून कोरून बनवलेला दिसून येतो. या मार्गावरचं प्रवेशद्वार अतिशय देखणं आहे. त्यावर कमलपुष्प आणि शरभशिल्प कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या ओसरीच्या भिंतीवर आठ फूट उंचीचा कोरीव हनुमान आहे. पायाखाली असूराला चिरडणर्‍या हनुमंताला शेंदूर फासला आहे. इथून खाली जाण्यासाठी साधारण पंचावन्न पायर्‍या उतराव्या लागतात. नंतर कातळकड्याला उजवीकडे ठेवत वळसा मारून आलो त्या डोंगरधारेवरून पायथा गाठता येतो.

c

शिल्पकाम
या किल्ल्याच्या पोटात कोरलेलं सुंदर लेणं आपल्याला थेट दहाव्या शतकात घेऊन जातं. या लेण्याला अंगणासारखे मोठे प्रंगण असून त्यावर दगडी चिरे बसविलेले आहेत. या प्रांगणात अनेक भग्न मुर्ती आणि शिल्पं पडलेली आहेत. त्यापुढे मोठी ओसरी असून त्यावर जैन लयन पद्धतीप्रमाणे शिल्पकाम दिसून येतं. ओसरी मधील छातावर नृत्य करणार्‍या मुर्तींचं गोलाकार असं सुंदर शिल्प असून ओसरीचे स्तंभ खालपासून वरपर्यंत कलाकुसरीने नटले आहेत. वरच्या भागात यक्षमुर्ती लक्षवेधी आहेत. ओसरीतून आत जाण्याच्या प्रवेशद्वारावर शिल्पकाराने अत्यंत नाजूक नक्षीकाम कोरून त्यात त्याचा प्राण ओतलेला दिसतो. आंत भलं मोठं विहार आहे.
अप्रतिम बुद्धमूर्ती
विहाराच्या आत गर्भगृह असून त्यात बुद्धमूर्ती आहे. विहारातील स्तंभही अलंकृत असून त्यापैकी फक्त एकाच खांबाने सध्या लेणं तोलून धरलंय बाकी उद्धवस्त झाले आहेत. ओसरीच्या गवाक्षांतून विहारात प्रकाश येण्याची योजना दिसते. ओसरीच्या उजव्या भिंतीवर आणि गर्भगृहातील मुर्तीच्या पायाशी शिलालेख आहेत. परंतु ओसरीतील शिलालेखही नष्ट झाला आहे त्याची काही अक्षरं फक्त दिसतात.
आपल्यासारख्या अस्सल भटक्यांना त्रिंगलवाडी खूप काही दाखविते. परिसरात आता चांगले रिझोर्टस् झाले आहेत. संपूर्ण फॅमिलीसोबत भेट देण्यासाठी शहरापासून अगदी जवळ असलेलं हे एक चांगलं स्थळ आहे. नुकताच पाऊस डोक्यावर येऊन उभा राहिला आहे. आता साधारण जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अल्पायुषी, विविधरंगी आणि मोहक रानफुलांचा मोहोत्सव बहारणार आहे. त्यामुळे त्रिंगलवाडी भेट बिलकूल चुकवू नका.
सदर लेखमाला
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असे डाऊनलोड करा डिजिटल मतदार कार्ड…

Next Post

कुस्तीच्या आखाड्यात गोळीबार; ५ जण ठार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
EuECHRMU0AQ3Vvk

कुस्तीच्या आखाड्यात गोळीबार; ५ जण ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011