शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – निसर्गमयी अर्जुनसागर

जानेवारी 23, 2021 | 1:04 am
in इतर
0
IMG 0127

निसर्गमयी अर्जुनसागर

‘जल हेच जीवन’. पंचमहाभूतांपैकी ‘आप’ म्हणजेच पाणी हे भुतलावरील सर्व प्राणीमात्रांचे जीवन आहे. कुठलीही नदी असो संपूर्ण भारतात ती पवित्र आणि पुजनीय मानली जाते. नद्यांच्या काठांवरच प्राचिन काळापासून लोकसंस्कृती वसलेल्या आढळतात. वर्षभर नदीचे पाणी पिण्यासाठी तर वापरण्यात तर येतंच परंतु आजुबाजूचा परिसर, वन आणि शेतीने सुजलाम् सुफलाम् होण्यासाठीही तिचा उपयोग होतो. अनेक ठिकाणी नदीचे पाणी अडवून धरणे बांधली गेली आहेत. नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील असाच एक निसर्गरम्य जलाशय म्हणजे ‘अर्जुनसागर’.

कुलथे e1610123297171
सुदर्शन कुलथे
गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक

तब्बल ६१० मिलीयन क्युबिक मी. पाण्याची साठवण क्षमता असलेल्या ह्या धरण परिसराचा परिघ दाट जंगलाने वेढलेला आहे. डोंगर-दर्‍यांनी व्यापलेल्या या क्षेत्रावर निसर्गदेवतेने मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. आपण सर्वजण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आतुर असतो. कधी दाट वृक्षराजीतून तर कधी गवताळ माळरानातून भटकण्याची मजा काही औरच. या अर्जुनसागर क्षेत्रात जलाशयाच्या भोवती वनपर्यटन करतांना फूलं, पक्षी आणि प्राण्यांच्या अद्भुत दुनियेची सफर घडते. विषेशतः येथील वर्षाविहार निसर्ग भटक्यांसाठी स्वर्गानुभूती देऊन जातो.
नाशिकहून वणी – नांदूरी – अभोणा – कनाशी – अर्जुनसागर असा ९५ कि.मी. चा रस्ता जातो. अर्जुनसागरला पोहोचताना धरणाची भिंत नजरेस येते.

दक्षिणोत्तर असलेल्या या भिंतीच्या एका टोकाकडील उंचवट्यावर पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. त्यात राहण्याची सोय होऊ शकते. विश्रामगृहातून संपूर्ण धरण, जलाशय आणि भोवतालच्या वनाच्छादित डोंगरांचा निसर्गमयी परिसर कॅमेर्‍याच्या एकाच फ्रेममध्ये बसतो. पुनद धरणाच्या अर्जुनसागर जलाशयाभोवती भटकंती करण्यासाठी वनविभागातर्फे १३ कि.मी. चा निसर्ग परिक्रमा मार्ग (नेचर ट्रेल) निर्माण करण्यात आला आहे. धरण भिंतीच्या दुसर्‍या टोकाला लागून असलेल्या कुर्णा डोंगराच्या कुशीतून ही निसर्गवाट सुरू होते.

IMG 0177

पावसाळ्यात भोवतालच्या डोंगरांतून वाहणारे छोटे छोटे धबधबे, त्यातून फुटलेले असंख्य झरे आणि झुळझुळ वाहणारे ओहोळ असा खेळ इथे अनुभवायला मिळतो. कुर्णा डोंगराच्या पोटात ‘गंगा-जमुना’ हे भुगर्भातून पाण्याचा स्त्रोत असलेले दोन मोठे तलाव हे या वनातील नैसर्गिक खजिनाच आहे. डोंगर धारेवरून जाणारी ही वाट चढाई-उतराई करत आपल्याला अनेक दुर्मिळ वनस्पतींबरोबर डेरेदार वृक्षांच्या खालून फिरवते. खैर, आवळा, साग, जांभुळ, आंबा, रानभेंडी, पिंपळ, वड असे असंख्य वृक्ष आपल्याला दिसून येतात. या वृक्षराजीतून फिरतांना आपण त्यांना बघण्याच्या आतच इथल्या वन्यप्राण्यांना आपली चाहूल लागलेली असते. बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर, उद मांजर, ससा, वानर, मुंगुस यांसारखे वन्यजीवांचा इथे अधिवास आढळतो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल सोबतच अनेक वन्यपक्षी अर्जुनसागरभोवताली गस्त घालत असतात. या पक्ष्यांचं निरिक्षण करतांनाच इथे ‘उडणारी खार’ आपल्याला आश्‍चर्यचकीत करू शकते. वन्यजीव विभागात या उडत्या खारीची नोंद नाही परंतु स्थानिक तिचा अधिवास सांगतात. विविध प्रकारचे बगळे, करकोचा, पाणकावळा, रोहित, बदक तसेच स्थलांतरीत पक्षी असे अनेक पाणपक्षीही जलाशयात आपलं अस्तित्त्व दाखवत असतात. पशुपक्ष्यांच्या या निरिक्षणासोबत मधूनच लटकणार्‍या लता-वेली आणि विविध ऋतुंमधील दुर्मिळ फुलांचा बहर मनाला उल्हासित करत असतो. अशा सर्व नैसर्गिक उधळणीमुळेच अर्जुनसागर परिसर जलविहार, पर्वतारोहण, निसर्ग पर्यटन, माऊंटन बाईकींग, सायकलिंग अशा विविध गोष्टींसाठी पर्यटकांना नेहमीच साद घालत असतो. त्यामुळेच निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, साहसवीर, पक्षी निरिक्षक, वन्यजीव तज्ञ, वृक्ष अभ्यासक यांना ‘अर्जुनसागर’चे नेहमीच आकर्षण असते.

IMG 0120

कळवण तालुक्याचा हा परिसर गुजरात राज्याच्या सीमेला लागून वसलेला आहे. थेट गुजरातच्या सीमेपर्यंतही ट्रेक करता येतो. जसजसं सीमेकडे जावं तसं जंगल अधिक गहीरं होत जातं. पुनंद आणि तिच्या छोट्या उपनद्यांच्या काठांवर झुळझुळणार्‍या उथळ पाण्याच्या काठांवरून हिंडण्याचीही मजा काही औरच. सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीतल्या या अर्जुनसागर जलाशयाच्या परिसरातून महाराष्ट्रातल्या सर्वोच्च साल्हेर किल्ल्याचे विहंगम दृश्य नजरेच्या टप्प्यात येते हे विशेष. त्याचबरोबर पुनंद नदीचे उगमस्थान मानला जाणारा ‘टकारा’ सुळका अगदी ठळकपणे खुणावत असतो. जलाशय परिसरात पायी फिरून थकायला होत असेल तर अनेक छोट्या पाड्यांवरून गाडी रस्त्यानेही चक्कर मारता येते.
कळवण तालुक्याच्या ‘पुनद-अर्जुनसागर निसर्ग पर्यटन’ क्षेत्रात प्रतापनगर, उंबरदे, सुपले दिगर हे वनक्षेत्र येतात. धरणालगतचे हे वन एकुण १३०० हेक्टर क्षेत्रफळाचे आहे. ह्या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. कोकणा, महादेव कोळी, भिल्ल आणि इतर समाज असे सर्व लोक त्यांची स्थानिक संस्कृती, सण-उत्सव आणि लोककलांची जोपासना करतांना दिसून येतात. मा. आमदार श्री. ए. टी. पवार यांच्या पुढाकाराने पुनद धरणाची निर्मिती केली गेली. त्यामुळे सहाजिकच इथल्या बांधवांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यास मदत झालेली दिसून येते. धरणाच्या पाण्यामुळे इथला शेतकरीही सुखावला आहे.

IMG 0306

वनविभागातर्फे संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठन करून या भागाच्या वनसंवर्धनाला चालना दिलेली आहे. पथमार्ग, निवाराशेड, पॅगोडा, रेलिंग, निरीक्षण मनोरे, बोटींग आदी सुविधा इथे करण्यात आलेल्या आहेत. आता या निसर्ग पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती बरोबरच त्यांच्या लोक कलाकृतींवरही प्रकाश पडलेला दिसून येतो. येणार्‍या पर्यटकांना इथल्या ग्रामीण जीवनाबरोबर अस्सल आदिवासी पदार्थांचीही चव चाखता येते. आदिवासींच्या उपजिविकेचे एक साधन म्हणजे मासेमारी. त्यामुळे परिसरात मत्स्याहाराची मेजवानीही उपलब्ध होते. एकंदरीतच ‘अर्जुनसागर निसर्ग पर्यटन’ हे खर्‍या अर्थाने बावनकशी पर्यटन म्हणून सिद्ध होते आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – शनिवार – २३ जानेवारी २०२१

Next Post

येवला – ५० हजार रुपयाची लाच मागणा-या बाभुळगावच्या ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post

येवला - ५० हजार रुपयाची लाच मागणा-या बाभुळगावच्या ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011