शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – फोकस – सेन्सिबल अँड सेन्सिटिव्ह

by Gautam Sancheti
डिसेंबर 9, 2020 | 2:51 am
in इतर
0
IMG 20201209 WA0010 e1607482033874

सेन्सिबल अँड सेन्सिटिव्ह: सना मरीन

“Dare to dream.. and work hard to achieve them.. मुलींमध्ये क्षमता आहेत.. त्यांना फक्त त्याची जाणीव करून द्यायची गरज आहे. माझ्या आईने मला हेच सांगितले.. माझ्याच नाही तर प्रत्येक मुलीला मी हेच सांगेल.. असे म्हणून एक दिवसासाठी आपले पंतप्रधानपद त्यांनी एका सोळा वर्षांच्या मुलीला दिले होते.. “आपण आपली पुढील पिढी देखील राजकीय दृष्ट्या सजग केली पाहिजे.. सामाजिक, पर्यावरणीय, आर्थिक, आरोग्य अशा प्रश्नांना त्यांनी भिडले पाहिजे. आपल्यातल्या कौशल्याचा उपयोग समाजासाठी करायला पाहिजे…” हे उद्गार आहेत जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान ठरलेल्या सना मरीन यांचे.. त्यांच्या पंतप्रधान पदाला  एक वर्ष आज पूर्ण होत आहे. जगभरातल्या तरुणींचे रोल मॉडेल ठरलेल्या सना मरीन यांच्यावर हा खास फोकस….
स्वप्नील तोरणे
डॉ. स्वप्निल तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
      बरोबर एक वर्षापूर्वीची हि गोष्ट. युरोप मधील फिनलंड या देशात घडली.. जागतिक राजकारणाच्या पटलावर क्रांतिकारक ठरावी अशी हि घटना होती. फिनलंड हा तसा शांतताप्रिय देश. युरोप खंडामधील सर्वाधिक जंगले आणि तलावांचा हा देश अशी त्याची भौगोलिक ओळख. लोक हि इथल्या निसर्गाशी एकरूप झालेले.. काहीसे परंपरावादी पण तेवढेच जागरूक.
या देशात काही कालावधीपासून अशांत वातावरण निर्माण झाले होते. इथल्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत नसल्याने इतर पक्षांची मदत घेऊन सरकार चालवणे अवघड होत चालले होते.
टपाल कामगारांच्या संपामुळे फिनलंडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. संप हाताळताना  असंवेदनशील भूमिका घेतली असा आरोप  तत्कालीन पंतप्रधान अँटी रिन्ने यांच्यावर झाले.  संपूर्ण देशभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यांना आपल्या सहकारी पक्षांचा विश्वास गमावला. या मुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सोशल डेमॉक्रेटिक पक्षातून पंतप्रधानपदासाठी नवीन चेह-याचा शोध सुरू झाला. हा शोध घेताना खूप झगडावं लागलं नाही. वाहतूक आणि संपर्क मंत्री असलेल्या सना मरीन यांची पक्षानं आपला नेता म्हणून निवड केली. आणि त्या फिनलंडच्या पंतप्रधान झाल्या.
  १० डिसेंबर २०१९ रोजी सना मरीन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली..  वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी सना मरिन यांनी जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवलेला आहे.
ELWVro UwAsMW7L
    गेल्या वर्षी याच दिवशी फिनलंडमध्ये पाच घटकपक्षांनी युती करत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे पाचपैकी चार पक्षांची धुरा महिलांच्या खांद्यावर आहे. युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक हे 35 वर्षांचे, तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डिन या 39 वर्षांच्या आहेत. आतापर्यंत होनारुक हे सर्वात तरुण पंतप्रधान, तर आर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान होत्या. दोघंही पदावर असतानाच, दोघांचाही विक्रम मोडत सना मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि साहजिकच सर्वात तरुण महिला पंतप्रधानही ठरल्या आहेत.
          सना यांचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हताच, आपल्या आयुष्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं.  सना या लहान असतानाच त्यांचे आईवडील परस्परांमधल्या वादामुळे वेगळे राहू लागले होते. पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनं आणि तिच्या आईच्या  एका मैत्रिणीनं केला. सना आपल्या या कुटुंबाचा उल्लेख करताना सांगते, “जसे इंद्रधनुष्य विविध रंगी असते त्या प्रमाणे माझे कौटुंबिक आयुष्य देखील विविध रंगी आहे.” जानेवारी 2018 मध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला . तिचे नाव एम्मा ठेवले आहे. आपल्या फियानसी मार्कस रिक्केनन यांच्या समवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या सनाने  ऑगस्ट 2019 मध्ये त्याच्या समवेत लग्न केले.
          त्यांच्या कुटुंबातली उच्चशिक्षण घेतलेली एकमेव स्री म्हणून त्यांची ओळख आहे. मास्टर ऑफ अँडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स ही पदवी घेतल्यानंतर  त्या राजकारणात आल्या. त्या एकविसाव्या वर्षी सोशल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सहभागी झाल्या. आपल्या स्पष्ट विचारसरणी मुळे लवकरच त्या पक्षाच्या उपाध्यक्ष झाल्या.
        फिनलंडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असतानाच  2013 मध्ये टॅम्परे शहराच्या नगर परिषदेच्या प्रमुख म्हणून सना या काम करत होत्या.  तेव्हाच त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्या फिनलंडमध्ये लोकप्रिय झाल्या.  बैठकांमध्ये आपले मुद्दे सडेतोड आणि ठाम मांडणाऱ्या, बैठकीतील परिस्थिती कौशल्यानं हाताळणाऱ्या सना यांचे यू टय़ूबवरील व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय ठरले  तिथून पुढे  राजकीय कारकिर्दीचा आलेख वर चढतच गेला.  अत्यंत्य आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या कौशल्याने सांभाळल्या. त्यामुळेच स्पर्धेत ज्येष्ठ श्रेष्ठ असताना देखील त्यांची सर्वोच्य पदावर निवड करण्यात आली असावी.
ELmhetjWoAEI lE
     सना यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक वेगवेगळ्या विषयांमुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या. त्यांनी कामगारांसाठी कामकाजाचा चार दिवसांचा आठवडा करण्याचा प्रस्ताव आणला आहे. “देशातील जनतेला त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्यासाठी वेळच मिळत नाही. लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. एकमेकांवर प्रेम करावं. त्यांच्या आवडीनिवडी आणि छंद जोपासावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसारख्या कार्यक्रमांवर भर द्यावा. लोकांच्या रोजच्या कामकाजातील हा महत्त्वाचा टप्पा असेल, असं मला वाटतं,” असं सना यांनी सांगितलं. सना  यांनी आणलेल्या प्रस्तावानुसार, फिनलँडमधील कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवसांची सुट्टी मिळणार असून फिनलँडच्या नागरिकांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. त्यांनी आताच्या कामकाजाचे तासही कमी करणार असल्याचं सांगितलं आहे. कामाचे तास आठ तासांवरून ६ तास करणार असल्याचं त्या म्हणाल्या.
        दोन महिन्यांपूर्वी लो कट ब्लेझर घातल्यामुळे त्यांच्या वर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. पंतप्रधानपद देश चालवण्यासाठी आहे, मॉडेलिंग करण्यासाठी नाही अशा शब्दात विरोधकांनी सना यांच्यावर तोफ डागली होती. मात्र सोशल मीडियावरून आय अँम विथ सना असे कँपैन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिला एकत्र आल्या. आणि त्यांनी सना यांच्या विचारांना पाठिंबा दिला.
लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आता शब्दांपलिकडे जाऊन कृती करणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पंतप्रधानपदी पदभार घेतल्यावर सना यांनी दिली होती. त्याचं प्रमाणे त्यांची वाटचाल सुरु आहे. कोरोनाच्या काळात जो पर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणतीच व्यक्ती सुरक्षित नाही.. अशा पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली. पर्यावरण  संरक्षण हा त्यांचा आवडीचा विषय.
सेन्सिबल अँड सेन्सिटिव्ह असतांनाच आपल्या विचारांना ठामपणें मांडणाऱ्या आणि त्या प्रमाणे कृती करणाऱ्या सना यांचा आदर्श केवळ तरुणींनी नव्हे तर सर्वांनीच घ्यायला हवा..
सदर लेखमाला
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचे निधन; ४०गावातील घटनेने सर्वत्र हळहळ

Next Post

5G घडविणार क्रांती; होणार हे सारे बदल…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
5G e1655285503788

5G घडविणार क्रांती; होणार हे सारे बदल...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011