मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – फोकस – बहुआयामी जेसिंडा

ऑक्टोबर 21, 2020 | 1:08 am
in इतर
0
EkiiAmJXUAELzwj

इम्पॅथेटिक अँड इफेक्टिव्हः जेसिंडा आर्डेन

        “It takes courage and strength to be empathetic, and I’m very proudly an empathetic and compassionate leader. I am trying to chart a different path, and that will attract criticism but I can only be true to myself and the form of leadership I believe in.”
हे वाक्य आहे जेसिंडा आर्डेन यांचे. न्यूझीलंडच्या तरुण पंतप्रधानांचे. १७ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत लेबर पार्टीच्या नेत्या असलेल्या जेसींडा यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. या देशाच्या आजवरच्या इतिहासात एवढा मोठा विजय कोणत्याच पक्षाला मिळाला नव्हता. पक्षाच्या धोरणापेक्षा हा विजय जेसिंडा आर्डेन यांच्या नेतृत्वाचा असल्याचे जगभरातील तज्ज्ञ ठाम मत व्यक्त करीत आहे. म्हणूनच त्यांच्या एकूणच विचार आणि व्यक्तिमत्वावर आजचा फोकस…
स्वप्निल तोरणे
डॉ. स्वप्निल तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
         न्यूझीलंडमधील राजकीय व्यवस्थेत एकूण पाच पक्षांचे अस्तित्व आहे. तरी अमेरिका आणि ब्रिटन प्रमाणे या देशातील मुख्य लढत दोनच पक्षांमध्ये होते. विशिष्ट प्रकारच्या निवडणूक पद्धतीमुळे येथे अनेक वर्षांपासून एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. लोकांना इथे दोनदा मत देण्याचा अधिकार असतो. एक मत आपल्या स्थानिक मतदार संघातील आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी, तर दुसरे मत पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या राष्ट्रीय पक्षासाठी द्यावे लागतात. २०१७ च्या निवडणुकीतही खरंतर नॅशनल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण डाव्या विचारसरणीची ग्रीन पार्टी आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन लेबर पार्टीच्या जेसिंडा पंतप्रधान बनल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षांनी झालेली ही निवडणूक. केवळ ५० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला न्युझीलंड हा छोटा पण विकसित देश. लोकसंख्या कमी असली तरी या देशाचे  जागतिक स्तरावर निश्चित असे महत्त्व आहे.
खरंतर न्यूझीलंड मधली ही निवडणूक १९ सप्टेंबरला होणार होती. जेसिंडा यांनी ही निवडणूक जवळपास  महिनाभर लांबणीवर टाकली. त्याचे कारण म्हणजे, एका कुटुंबातील चार जणांना संसर्ग असल्याचे निदान झाले होते. तसा हा आकडा छोटा असला तरी न्यूझीलंडमधील निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्याआधी एकशे दोन दिवसांच्या कालावधी मध्ये एकाही नव्या रुग्णांची नोंद झाली नव्हती.
      सात आठवड्याचा कडक लॉकडाऊनमध्ये सातत्याने त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवले.  म्हणूनच न्यूझीलंडच्या नागरिकांना जेसींडा यांचे नेतृत्व अत्यंत खंबीर स्वरुपाचे तेवढेच संवेदनशील असे वाटते.  लॉकडाऊनमध्ये बाधित रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची व्यापक तपासणी अशा अनेक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. त्याद्वारे तेथे कोरोनावर मात केली होती. मे महिन्यात तिकडे अनलॉकिंग सुरू झाले.
       याचबरोबर क्रिस्तचर्चमधील दहशतवादी हल्ला आणि तेथील बेटांवर झालेले ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक संवेदनशील घटनांमध्ये त्यांचे नेतृत्व हे जनतेला अधिक परिणामकारक असे वाटले होते.
        जेसिंडा यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच वेगळा ठरणारा आहे. हॅमिल्टन येथे त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांचं वास्तव्य हे ग्रामीण भागात गेले. त्यांचे वडील पोलीस अधिकारी, तर आई एका शाळेत केटरींग असिस्टंट होत्या. विद्यार्थीदशेपासूनच त्यांना राजकारणामध्ये रस होता. अठराव्या वर्षी त्यांनी लेबर पार्टी जॉईन केली. महाविद्यालयीन जीवनात देखील त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्यांनी वाईकातो युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स अँड पब्लिक रिलेशन या विषयात पदवी प्राप्त केली.
त्यानंतर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान क्लार्क यांच्या कार्यालयांमध्ये काम केले. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या सल्लागाराच्या स्वरूपात देखील त्यांनी काही दिवस काम केले होते. २००८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. आणि तेथील संसदेत त्यांचा प्रवेश झाला. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना पार्टीचे नेतृत्व मिळाले. आणि सहा महिन्यात त्यांच्या पक्षाला बहुमत नसताना देखील वेगवेगळ्या समविचारी पक्षांसमवेत समवेत युती करत त्यांनी पंतप्रधान पद मिळवले. ३७ व्या वर्षी पंतप्रधान पद मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. एवढ्या तरुण वयात सत्ता स्थापन करून जागतिक स्तरावर त्या अधिक चर्चेत आल्या.
EkhTH7SXYAACKJ
          पाकच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यानंतर पंतप्रधानपदावर विराजमान असताना मातृत्व स्वीकारणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या नेत्या ठरल्या. सहा आठवड्यातच त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या. एवढेच नव्हे तर लगेच आपल्या छोट्या मुलीसमवेत त्या युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंबली मध्ये देखील सहभागी झाल्या. जेसिंडा यांचे फियांसी क्लार्क गेफॉर्ड हे टीव्ही शो चे प्रेझेंटर आहेत. त्यांच्या टीव्ही शो फिश ऑफ दि डे चांगलाच लोकप्रिय आहे. २०१२ मध्ये दोघं एकमेकांना भेटले आणि त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहायचा निर्णय घेतला. २०१८ च्या जूनमध्ये त्यांना मुलगी झाली. या दोघांची इंगेजमेंट २०१९ मध्ये झाली.
          मे महिन्यात घडलेला एक प्रसंग या दोघांच्या साधेपणाचे उत्तम उदाहरण म्हणून प्रसिद्ध झाले. त्याचे असे झाले की,  न्यूझीलंडमध्ये अनलॉक सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग सांभाळून रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी त्यांनी दिली. पंतप्रधान असलेल्या जेसिंडा आपल्या फियन्सी क्लार्क गेफॉर्ड यांचे समवेत  वेलिंग्टन येथील एका रेस्टॉरंट मध्ये गेल्या. मात्र नियमांमुळे तिथे कमी लोकांना प्रवेश देण्यात येत होता. तेव्हा पंतप्रधानांनी देखील तिथे बाहेर उभे राहून वाट पाहिली. सोशल मीडियावर ही बाब व्हायरल झाली. क्लार्क यांनी ट्विटरवरुन सांगितले की, ही माझीच चूक होती. मी अगोदर टेबल बुक करायला पाहिजे होते.
 १७ तारखेला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जेसिंडा यांच्या पक्षाला न भूतो असा दणदणीत विजय मिळाला आहे. त्यांना जवळपास पन्नास टक्के मते मिळाली. जेसिंडा आर्डेन यांचा विजय हा त्यांच्या संवेदनशील, सहिष्णू आणि तितक्याच कणखर भूमिकेचा आहे. त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य विचारल्यावर त्या सांगतात.
“It takes courage and strength to be empathetic, and I’m very proudly an empathetic and compassionate leader. I am trying to chart a different path, and that will attract criticism but I can only be true to myself and the form of leadership I believe in.”
न्यूझीलंड मधील लोक हे राजकीदृष्ट्या अतिशय सजग आणि जागरूक आहेत. यामुळे हा विजय अधिकच महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. जगभरातील तज्ज्ञांच्या मते जेसिंडा या नव्या युगाच्या नेत्या आहेत.
कोणताही अभिनिवेश न बाळगता त्या संवाद साधतात. त्यातला प्रामाणिकपणा आणि हेतू लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्या कमालीच्या यशस्वी ठरल्या आहेत. ज्वालामुखी सारखी नैसर्गिक आपत्ती असो की दहशतवादी हल्ला.. कोरोना सारखी महामारी असो की स्वतःचे मातृत्व अशा अनेक बाबींमध्ये संवेदनशीलता बाळगताना ठाम भूमिका घेत फुललेले त्यांचे नेतृत्व हे जगभरातील तरुणांसाठी रोल मॉडेल ठरले आहे.सदर लेखमाला
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – बुधवार – २१ ऑक्टोबर २०२०

Next Post

नंदुरबार जवळ ट्रॅव्हल्स बस दरीत कोसळली – ६ ठार ३५ जखमी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Diwali22
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – जगभर अशी साजरी होते दिवाळी! देशोदेशी अशा आहेत विविध प्रथा

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
Next Post
IMG 20201021 WA0023

नंदुरबार जवळ ट्रॅव्हल्स बस दरीत कोसळली - ६ ठार ३५ जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011