शाळा सुरू होणार ही मोठीच शुभवार्ता!
अखेर मुंबई आणि ठाणे वगळता राज्याच्या अन्य भागात २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते दहावी असे वर्ग सुरू होणार आहेत. यातील नववी व दहावीचे वर्ग आधीच सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू होत असल्याने माध्यमिक विभाग खऱ्या अर्थाने सुरु होईल. शाळेची घंटा परत एकदा वाजेल आणि शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा जिवंत होतील. विद्यार्थ्यांचे चेहेरे मित्र-परिवाराच्या प्रत्यक्ष भेटीने पुन्हा एकदा उजळतील.
कोरोनाने विविध क्षेत्रात नुकसान करून ठेवले आहे. त्याचा फटका शिक्षण खात्यालाही बसला आणि सर्वांचे शिक्षण जवळपास थांबले. राज्यात व देशात ऑनलाइन शिक्षण चालू असूनही मी ‘शिक्षण थांबले’ असे म्हटले. त्याचे कारण ऑनलाईन शिक्षण हे काही खरे शिक्षण नव्हे. आजही असंख्य विद्यार्थी या शिक्षणात सहभागी होऊ शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे आवश्यक तो स्मार्टफोन, इंटरनेट घेण्यासाठी पैसे, घरी ब्रॉडबँड आणि अन्य अत्याधुनिक सोयी नाहीत. आई-वडिलांच्या उत्पन्नातही घट झाली किंवा ते उत्पन्न बंद पडले. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे.
आपण मुलांना आर्थिक कारणामुळे शिक्षण प्रवाहात ठेवू शकत नाही. ही पालकाच्या मनाला लागलेली बोच खूप मोठी आहे. दोन वेळेच्या जेवणाची निश्चिती नाही, मग ब्रॉडबँड वगैरे सोयीचा विचारही करता येत नाही, अशी स्थिती आहे. असा फार मोठा वर्ग आहे. मुंबईसारख्या शहरात अनेक पालकांनी आपल्या मुलांना गावाला पाठवून ठेवले आहे. तिथे त्यांना मोबाईलची कोणतीही रेंज नसल्याने तेथे मोबाईल वापरू शकत नाही. त्यामुळे शिक्षणाचा तर प्रश्नच नाही. त्याचवेळी, जे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत किंवा घेऊ शकत आहेत तेही आणि समाधानी आहेत असे वाटत नाही.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव खूप जास्त असल्याने शाळा उशिरा सुरू करणे हे मी समजू शकतो. परंतु सध्याच्या काळात मुंबई, ठाण्यात सर्व सुरळीत सुरू झाले असल्यामुळे शाळा सुद्धा सुरू व्हायला हव्यात. यानिमित्ताने शेकडो मुले पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळली तर त्यांचे आयुष्य कारणी लागेल. कारण सध्या स्थिती काही चांगली नाही.
‘महाराष्ट्र टाइम्स’चे श्री नीरज पंडित यांनी गेले काही दिवस सध्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रकाशझोत टाकणारी मालिका लिहिली आहे. त्यातले प्रमुख मुद्दे असे- १. पन्नास टक्के विद्यार्थी हे या ऑनलाइन शिक्षणाच्याही बाहेर आहेत. त्यामुळे त्या मुलांचे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न आहे. २. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे एक मोठी समस्या अशी की त्यांचा लिखाणाचा सराव सुटला आहे. शिक्षणासोबत आवश्यक ती कौशल्ये घटली आहेत. आणि अभ्यास कपात करून परीक्षा सोप्या करण्याची मागणी त्यामुळे होते आहे. ३. विशेष मुलांच्या जीवनावर कोरोनामुळे निर्माण झालेल्या नवीन जीवनशैलीचा खूपच मोठा परिणाम झाला. त्या विद्यार्थ्यांची शाळा अजून सुरू करण्यात आलेले नाही. आज महाराष्ट्रात पाचशेहून अधिक विशेष मुलांच्या शाळा आहेत. या शाळांचे काम कसे चालेल याबाबत कोणताही स्वतंत्र आदेश काढण्यात आलेला नाही. ४. दहावीनंतर पुढील शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी दिसणारी चुरस यंदा फारशी पाहायला मिळाली नाही. यंदा अकरावी तसेच आयटीआयच्या प्रवेशाला नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांच्या मुलांनी कुटुंबाला अर्थार्जनासाठी हातभार लावण्यास सुरुवात केली. ही परिस्थिती शहरात निम्न मध्यमवर्गीयांमध्येही असल्याचे सांगण्यात येते. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही झाला. ५. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात दिवाळीनंतर ऊसतोड, वीटभट्टी मजूर व आदिवासी भागातून हजारो मजूर बागायती पट्ट्यात काम करण्यासाठी गाव सोडून गेले आहेत. दगडखाणीवर काम करणाऱ्यांची संख्या तीस लाखांच्या आसपास असते. यात शाळा बंद असल्यामुळे मुलेही आई-वडिलांसोबत कामासाठी गेली आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण सुटले आहे. ६. दुय्यम दर्जाच्या डिजिटल शिक्षणामुळे मुलांचे नुकसानच झाले.

हे सर्व मुद्दे लक्षात घेतले आणि आपल्या आसपासची परिस्थिती पाहिली तर सर्व स्तरावरील मुलांचे अभ्यासात काय होणार आहे हे दिसून येते. ग्रामीण भागात आपल्या मुलाचे शिक्षण बंद करून त्यांना रोजंदारीवर लावणे यात कोणत्याही पालकाला आनंद होत नसतो. परंतु त्यांचाही नाईलाज झाला. याला अपवाद अर्थातच श्रीमंत शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचा आणि ज्यांच्या घरी चांगले मोबाईल, लॅपटॉप, ब्रॉडबँड यंत्रणा आहे अशा मुलांचा. त्या मुलांचे शिक्षण नियमित झाले हा आनंदच आहे, परंतु बरीचशी मुले ही शिक्षणाच्या कक्षेबाहेर राहिली याचे दुःख जास्त आहे.
कोरोना आल्यानंतर सगळ्यांनाच ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागले, त्यामुळे अर्थातच शिक्षकही घरून काम करायला लागले. बऱ्याच शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण कसे द्यायचे, यासाठी विविध साधने कशी वापरायची, शिक्षणाची नेहमीची पद्धत बदलून ऑनलाइन शिक्षणाला सूट होईल, असे शिक्षण कसे द्यायचे हे शिकावे लागले. सगळ्यांनाच ते जमले असे नाही. त्यावेळी शिक्षण खात्याचे काम मात्र चालू होते आणि नियमित वेगाने वेगवेगळे आदेश त्यांच्याकडून काढले जात होते. ते पुरे करता करता सगळ्या शाळांच्या नाकीनऊ दम येत होता.
आता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्याचा निकाल जूनमध्ये लागला तरी पुढचे वर्ष सुरू होण्यास उशीर लागणार आहे. हे सारे लक्षात घेता यावर्षी सगळ्याच राज्यांमध्ये शैक्षणिक वर्षाला सुट्टी द्यायला हवी होती असे मला वाटते. काही मुले शिकतात, काही मुले शिकायची इच्छा असूनही शिकू शकत नाहीत आणि शाळा बंद आहेत. अशावेळी या शैक्षणिक वर्षाचा अट्टाहास का असा प्रश्न येतो. हा मुद्दा यापूर्वीही अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवला आहे, परंतु कोणत्याही राज्य सरकारने असा निर्णय आतापर्यंत घेतला नाही. तो का घेतला नाही हे कळण्यास मार्ग नाही.
आता दहावीचा अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी कमी करा, परीक्षा सोपी करा वगैरे मागण्या होत आहेत. याचा अर्थ जी काही निवडक मुले शिक्षण घेत आहेत, ती उत्तीर्ण होऊन पुढे जातील, मात्र आर्थिक चणचणीमुळे जी मुले शिक्षण घेऊ शकणार नाहीत ती हुशार असूनही इयत्ता दहावीतच राहतील. हा असमतोल फक्त शैक्षणिक नाही तर कोणतीही चूक नसताना पुढील वर्षीही दहावीतच राहणाऱ्या मुलाच्या अथवा मुलीच्या मनावर याचा काय परिणाम होईल आणि तो त्याच्या आयुष्यावर काय परिणाम करेल हेही लक्षात घेतले पाहिजे.
ऑनलाईन शिक्षण परिपूर्ण नाही. पाचवीपेक्षा लहान मुलांचे ऑनलाईन शिक्षण हा तर अधिकच काळजीचा विषय आहे. हे मुलांचे घडण्याचे वय आहे. त्याच काळात त्यांचा अभ्यास कच्चा राहिला तर त्याचे परिणाम पुढील सर्व शिक्षणावर पडणार आहेत, हे सरकार का लक्षात घेत नाही? म्हणूनच शाळा सुरु होत असल्याचा आनंद आहे. तोच आनंद मुंबई, ठाण्यातील विद्यार्थ्यांनाही लवकरात लवकर मिळावा ही सदिच्छा!
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22