आयुष्यातील अधिकाधिक वेळ विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यात गेल्यानंतरही समाजासाठी आपण काहीतरी करतच रहावं, अशा जाणिवा फार कमी लोक जपत असतात. कविता, कादंबरी, समीक्षा लेखन, वैचारिक लेख, चरित्रलेखन असे चौफेर लेखन करीत साहित्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या कवयित्री प्रा.विजया मारोतकर म्हणजे आपण समाजाचं काही देणं लागतो, या जाणिवा जपणारं नाव. सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तित्व.
आज सारी तरुणाई मोबाईलने वेडी झालेली आहे. मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी ‘पोरी जरा जपून’ या कार्यक्रमातून जनजागृती करणा-या त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांचे आजपर्यंत ३३ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात सार्थक,पाझर, संस्कार कलश, प्रतीक्षा, अहो, ऐकलत का…? पोरी जरा जपून,लॉकडाऊन हे सात कथासंग्रह आहेत.
स्वल्पविराम, आवर्तन,प्रवाह,आभाळ पेलतांना,रंगतरंग हे पाच काव्यसंग्रह, हिंदोला आणि ग्रीष्मपलाश हे दोन चारोळी संग्रह, उन्ह वेचता…, झाले मोकळे आकाश, सदाफुली, काही असेही,काही तसेही हे चार लेख संग्रह, आस्वाद आणि गंधसुगंध हे दोन समीक्षा संग्रह प्रकाशित आहेत.
सम्राट अशोक,भगवान गौतम बुद्ध,आचार्य विनोबा भावे,डॉ राजेन्द्र प्रसाद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,कर्मवीर भाऊराव पाटिल,महर्षी धोंडव केशव कर्वे, देवी सरोजिनी नायडू,यशवंतराव चव्हाण, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, इतिहासाच्या खोल तळाशी भाग १ आणि भाग २ असे बारा चरित्रग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. धुक्यात हरवली वाट ही त्यांची कादंबरी प्रसिध्द आहेत.
महाराष्ट्र टाइम्स मधून ‘वाटा आणि वळणे’, सकाळमधून ‘सदाफुली’ पुण्यनगरीमधून ‘मंथन’ देशोन्नतीमधून ‘काही असेही…काही तसेही’ व ‘काव्यकुंचला’ स्तंभलेखन करत असतात. हे तसेच तरुण भारत या वृत्तपत्रामधून त्या सातत्याने लेखन करत असतात. त्या महाराष्ट्रातील एक उपक्रमशीलशिक्षिका आहेत.
‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत ‘पोरी जरा जपून…’ या काव्यमय कार्यक्रमाचे सादरीकरण आजवर कोल्हापूर, कराड, लोणावळा, बारामती, आळंदी, पुणे, नांदेड, परभणी, बीड, हैद्राबादसह विदर्भातील अनेक ठिकाणी केले आहे. साधारत: महाराष्ट्रभर २६६ कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाच्या त्रिशताब्दीकडे वाटचाल सुरु आहे.
कवयित्री प्रा.विजया मारोतकर या विदर्भातील प्रतितयश साहित्यिक असून ‘माय मराठी नक्षत्र समूह, नागपूरच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आह्जेत. ‘आम्ही लेखिका’ समूहाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
शिक्षक भारती पुरस्कृत राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन संसथेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. दि २५ व २६ डिसेंबर २०१९ रोजी सर्वप्रथम संपन्न झालेल्या भारतातील झालेल्या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहेत.
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व पालघर जिल्ह्यातील कुडूस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत.
स्वल्पविराम- काव्यसंग्रह, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे २०१०
आभाळ पेलतांना- काव्यसंग्रह-पद्मगंधा प्रतिष्ठान पुरस्कार
सार्थक- कथा संग्रह -अण्णाभाऊ साठे ,उत्कृष्ट वाङ्ममय निर्मिती पुरस्कार,नांदेड
धुक्यात हरवली वाट- कादंबरी अक्षर साधना पुरस्कार,कुडूस, पालघर,तेजस्विनी पुरस्कार, राजूरा
संस्कार- कथा चालना मासिक मुंबई पुरस्कार
ओढ- कथा चालना मासिक पुरस्कार,आचार्य मामासाहेब क्षीरसागर पुरस्कार २०१७
लोकमत सखी पुरस्कार,
आदर्श शिक्षिका पुरस्कार,
लालबहादूर शास्त्री फाऊंडेशनचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार
डॉ.राजेन्द्रप्रसाद संस्था जीवन गौरव पुरस्कार
न्यू इंग्लिश संस्था,जीवन गौरव पुरस्कार
नागपूर महानगर पालिकेच्या वतीने ‘पोरी जरा जपून’ च्या २०० व्या सादरीकरणाकरिता
कार्य गौरव पुरस्कार व भव्य सन्मान
शिवराज उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, २०१२
पद्मगंधा प्रतिष्ठान सामाजिक पुरस्कार २०२०
कटगुण (म.फुले यांचे जन्मगाव)येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासह २५० विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कवीमनाच्या प्रा. विजया मारोतकर यांना पर्यटनाचा छंद आहेत.
आजपर्यंत त्यांनी जर्मनी- म्युनीच, फ्रँकफर्ट, बर्लिन, न्युरेमबर्ग, जपान-टोकियो, फ्रांन्स-पॅरिस, औस्ट्रीया, चेकरिपब्लिक-प्राग, स्वित्झर्लंड, नेदरलँड-एम्स्टर्डम, श्रीलंका, थायलंड बँकॉक, सॉल्व्हेनीया आदी देशात पर्यटन केले आहेत. आज आपण त्यांच्या आवाजात त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!