‘सशक्त सामाजिक जाणीवांना कवितेच्या आकृतीबंधात मांडणारा कवी’ : नारी लच्छवाणी
साहित्यिकाच्या साहित्यकृतीत आवतीभोवतीचं वास्तव सतत डोकावत असतं. म्हणून तर साहित्यकृती ही समाजाचे एक प्रतिबिंब असते, असे म्हटले आते. समाजातली माणसं, समाजातले प्रश्न, समाजातील जीवन पद्धती, त्या जीवन पद्धतीतील संस्कार, त्याचे कुटुंब, त्यांचे संसार, त्यांची नाती, संसारातले सोहळे, रितीरिवाज, रूढी, परंपरा, माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध, या सर्वांचे अवलोकन साहित्यिक करत असतो.
त्याचप्रमाणे मानवी मनातली आंदोलने तो त्याच्या शरीर आणि मनाच्या पातळीवर अनुभवत आणि टिपत राहतो. त्यातून त्याच्या मनात सतत मंथन आणि चिंतन सुरु असते. उघड्या डोळ्यांनी, कानांनी पाहिलेली, अनुभवलेली तिथल्या जगाची सुखदुःखं हा साहित्यिकाच्या अनुभवाचा फार मोठा भाग होतो. कारण काही अनुभव हे त्याच्या जगण्याशी संबंधीत असतात.
काही घटनेत तो स्वतः सहभागी झालेला असतो. काही वेळा समाजाच्या समस्यांना तोंड फोडण्याचा प्रयत्न करण्याचा मोह साहित्यिकाला होणे हे स्वाभाविक आहे. समाजजीवनाला साहित्यात स्थान नसेल तर वाचकाला किंवा प्रेक्षकांना ती साहित्यकृती आपली वाटत नाही. तिच्याशी वाचक मनाचे नाते कधी जुळत नाही. आपण जे वाचतो आहे ते सगळे उपरे, खोटे, न पटणारे आहे. असे त्याला वाटत राहते. मग असे साहित्य पुन्हा वाचायची इच्छा त्याला होत नाही. त्याच्या सभोवती वावरणारी माणसं असतात. त्यांच्या जगण्याच्या कथा, व्यथा वाचकाच्या परिचयाच्या असतात. म्हणूनच साहित्यकृतीमध्ये जीवनातली सगळी संभाव्यता अपेक्षित असते.
हे जीवन खरे मानवी जीवन असते. समाज जीवन असते. समाजाचा साहित्यावर जो परिणाम घडतो तो साहित्यिकाला नेहमी प्रेरणा देत असतो. प्रचलित प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न लेखक,कवीकडून होत असतो. कारण असे जीवन तो जवळून न्याहाळत असतो. अनेक सामाजिक घटना,प्रसंग साहित्यिकाला चिंतन करायला भाग पाडतात. तेव्हा त्याच्यातील संवेदनशील कलावंत जागा होतो. त्याला प्रेरणा देतो. साहित्याची बीजं समाजात रुजलेली असतात.
थोडक्यात समाजाचा साहित्यावर निश्चित परिणाम होतो. अशी साहित्यकृती आणि असे साहित्यिक शाश्वत मूल्यांचा अविष्कार करणारे ठरतात. खरे म्हणजे शाश्वत आणि वास्तव दर्शन देणारे साहित्य काळाच्या ओघात टिकते. ते केवळ त्यांच्या साहित्य मूल्यांमुळे नव्हे तर त्यातून प्रकट होणाऱ्या सामाजिक मुल्यांमुळे. त्यामुळे साहित्यिक हा परिस्थितीचा दास नसून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभलेला प्राणी आहे, हे विसरून चालणार नाही.
साहित्यिक हा शेवटी माणूस आहे. त्यामुळे तो समाजाची जबाबदारी ओळखून वागतो. कोणत्याही साहित्यकृतीत सामाज अपरिहार्यपणे डोकावत असतो. पण कलावंताच्या भोवतालचे तत्कालीन समाजजीवन किंवा जीवनपद्धती जशीच्या तशी साहित्यात चित्रित होत नसते. प्रमुख्याने प्रदेश, भाषा, संस्कृती यांचा महत्त्वाचा भाग असतो.
कवी नारी लच्छवाणी यांच्या कवितेचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कवितेला सामाजिक जाणिवांचे भान आहे . समाजातील अनिष्ठ रूढी,परंपरांवर त्यांची कविता कडाडून हल्ला करते. सामाजीक उत्थानासाठी त्यांची कविता आक्रोश करताना दिसते. अवतीभोवतीच्या घडणा-या विपरीत सामाजिक घटनांचा त्यांच्या कविता समाचार घेताना दिसतात. विश्वास आणि संवेदना हरवत चालल्याची खंत त्यांची कविता करताना दिसते. माणूस आपले माणूसपण हरवत चालला आहे. तो हिंसक श्वापदा पेक्षाही अधिक हिंसक आणि संवेदनाहीन बनत असल्याची मोठी खंत त्यांची कविता करताना दिसते.
कवी नारी लच्छवाणी हे सिंधी कवी आहेत. त्यांचे वास्तव्य मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आहे. त्यांनी सिंधी भाषेबरोबरच हिंदीतही कविता लिहिल्या आहेत. त्यांनी हिंदी व सिंधी या दोन्ही भाषांमध्ये काही काळ उद्घोषक म्हणून भारतीय रेडिओमध्ये सेवा केली आहे.
कविता लेखना बरोबर त्यांनी गायन आणि अभिनय या कलाक्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नाटकांचे भारतभर प्रयोग झाले आहेत. या कलेच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानमधील सिंध येथेही भेट दिली आहेत.तसेच कवितेच्या माध्यमातून दुबई येथे प्रवास केला आहे.
साधारणपणे कवी नारी लच्छ्वाणी १९६५ पासून नाट्य,गायन आणि कवितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे.आजपर्यंत त्यांनी हिंदी आणि सिंधी मिळून पन्नास नाटकात कामे केली आहेत. त्याचं बरोबर तीन सिंधी चित्रपटात कामे केली आहेत.
गाण्याच्या वेडातून त्यांचे तीन गाण्याचे गीत-गझल नावाने अल्बम प्रकाशित झाले आहे.विशेष म्हणजे त्यांनी देशभरातील सर्व भारतीय रेडिओच्या वेगवेगळ्या केंद्रावरून सहा महिने नॉन-सिंधी श्रोत्यांना सिंधी भाषा शिकविली आहे. अशा कवीच्या कवितांचा आज आपण त्यांच्याच आवाजात आस्वाद घेणार आहोत.
लेखाचा हिंदी अनुवाद –
‘मजबूत सामाजिक चेतना को कविता के रूप में चित्रण करनेवाला कवी: नारी लच्छवाणी”
एक लेखक के साहित्यिक कार्य में, उसके आसपास की वास्तविकता लगातार झाँकती है। इसलिए, यह कहा जाता है कि साहित्य समाज का प्रतिबिंब है। समाज में लोगों का अवलोकन, समाज में जीवन का तरीका, जीवन के तरीके में संस्कार, उनका परिवार, उनकी दुनिया, उनके रिश्ते,उनके सांसारिक समारोह, रीति-रिवाज, मानदंड, परंपराएं लोगों का एक दूसरे के साथ संबंध आदि का साहित्यिक आवलोकन करता है I
उसी तरह, मानव मन की गति के साथ, वह अपने शरीर और मस्तिष्क के स्तर पर अनुभव और अभिलेखीत करता है। इस कारण उनके दिमाग में निरंतर मंथन और चिंतन शुरू होता है। खुली आँखों और कानों से देखी जानेवाली दुनिया के सुख और दुख साहित्य के अनुभव का एक बड़ा हिस्सा होता हैं। क्योंकि कुछ अनुभव उसके जीवन से जुड़े होते हैं, कुछ मामलों में वह स्वयं शामिल होता है।
कई बार समाज की समस्याओं को उजागर करने की कोशिश करना साहित्य के लिए स्वाभाविक है। यदि सामाजिक जीवन को साहित्य में कोई स्थान नहीं है, तो पाठक या दर्शकों को यह साहित्य अपना नही लगता । पाठक का मन उससे कभी मेल नहीं खाता। हम जो कुछ भी पढ़ते हैं वह अजीब, गलत, असंगत है।
वह उस तरह से महसूस करता रहता है। फिर वह ऐसी सामग्री को फिर से पढ़ना नहीं चाहता। उसके आसपास ज्यों लोग है, उनके जीवन की कहानियाँ,सुख- दुख पाठकों को परिचित हैं। यही कारण है कि साहित्य में जीवन की सभी संभावनाएँ अपेक्षित हैं।
यह जीवन सच्चा मानव जीवन है, समाज जीवन है। साहित्य पर समाज का ज्यों प्रभाव पडता है, उसने हमेशा साहित्य को प्रेरित किया है। लेखक, कवि, प्रचलित प्रश्नों को संबोधित करने की कोशिश करता है। क्योंकि वह ऐसी जिंदगी को करीब से देख रहा होता है। कई सामाजिक घटनाएँ साहित्यिक को चिंतन तथा प्रतिबिंबित करने के लिए मजबूर करती हैं।
फिर उसमें ज्यों संवेदनशील कलाकार है वह जाग उठता है, प्रेरित होता है। साहित्य के बीज समाज में निहित हैं। संक्षेप में, साहित्य पर समाज का एक निश्चित प्रभाव है। इस तरह के साहित्यिक कार्य और ऐसे साहित्यिक कार्य शाश्वत मूल्यों के आविष्कारक बन जाते हैं। सच्चाई यह है कि अनन्त और वास्तविक दृष्टि देनेवाली सामग्री लंबे समय तक बनी रहती है।
यह केवल उनके साहित्यिक मूल्यों के कारण ही नहीं, बल्कि उन सामाजिक मूल्यों के कारण भी है । इस कारण साहित्यिक किसी परिस्थिती का गुलाम नही बनता । बल्कि स्वतंत्र व्यक्तित्व वाला व्यक्ति होता है । साहित्यकार भी आखिर मनुष्य ही है।
इसलिए वह समाज की जिम्मेदारी को पहचानता है। समाज अनिवार्य रूप से किसी साहित्यिक कृति में झाँकता है। लेकिन कलाकार के आस-पास का समकालीन सामाजिक जीवन, या जीवन का तरीका साहित्य में चित्रित नहीं किया जाता है। साहित्य मे विषेत: क्षेत्र, भाषा और संस्कृति का महत्वपूर्ण हिस्सा होता है।
कवि नारी लच्छवानी की कविता सामाजिक चेतना की विशेषता है। उनकी कविता समाज के अवांछनीय मानदंडों और परंपराओं पर जोरदार प्रहार करती है। उनकी कविता सामाजिक उत्थान के लिए आक्रोश करती है। उनकी कविताएँ उनके आस-पास घट रही सामाजिक घटनाओं की ख़बरों में देखी जाती हैं। उनकी कविताओं में विश्वास खोने और महसूस करने का दुःख देखा जाता है।
मनुष्य अपनी मानवता खो रहा है। जिस बड़े दुःख के साथ वह हिंसक जानवर की तुलना में अधिक हिंसक और असंवेदनशील हो जाता है वह उसकी कविता में दिखाई देता है। कवि नारी लछवानी सिंधी कवि हैं। वे भोपाल, मध्य प्रदेश में रहते हैं।
उन्होंने हिंदी के साथ-साथ सिंधीभाषा में भी कविताएँ लिखी हैं। उन्होंने कुछ समय के लिए हिंदी और सिंधी दोनों में भारतीय रेडियो पर एक उद्घोषक के रूप में काम किया है । कविता लिखने के साथ-साथ उन्होंने गायन और अभिनय के क्षेत्र में भी अपना नाम कमाया है। उनके कई नाटकों का प्रदर्शन पूरे भारतभर में हुआ है।
इस कला के माध्यम से उन्होंने पाकिस्तान के सिंध प्रांत का भी दौरा किया है। उन्होंने कविता के माध्यम से दुबई की यात्रा भी की है। आमतौर पर, नारी लच्छवानी 1965 से नाटक, गायन और कविता के क्षेत्र में काम कर रहे हैं।
आज तक वे हिंदी और सिंधी भाषा के पचास नाटकों में अभिनय कर चुके है। उन्होंने तीन सिंधी फिल्मों में अभिनय भी किया है। उनकी गाने के प्रति रुचि होनेसे उनके गीत-ग़ज़ल नामक तीन एल्बम प्रदर्शित हुये हैं। उन्होने देश भर के विभिन्न भारतीय रेडियो स्टेशनके द्वारा सिंधी भाषा को गैर-सिंधी श्रोताओं को छह महीने तक पढ़ाने का काम भी किया है। आज हम ऐसे कवि की कविताओं का उनकी आवाज़ में आनंद लेने जा रहे हैं।
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!