शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – कवी आणि कविता – प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ

जानेवारी 8, 2021 | 1:08 am
in इतर
0
Dyj58t0XQAAUyAA

मातीतल्या माणसांच्या जगण्याचा

हुंकार कवितेतून व्यक्त करणारे

लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ

मराठी बोलीनं मराठी भाषेचा मळवट भरविण्यात, विविध बोलींनी सजविण्यात अनेक साहित्यिकाचं योगदान आहे.मराठीच्या आहिरणी,कोकणी,मालवणी,झाडी,व-हाडी या आणि  इतर अनेक प्रादेशिक बोली आहेत.याबोली भाषांनी मराठी भाषा अधिक समृध्द बनली आहे. या व इतर अनेक सांप्रदायिक भाषा समुहातील भाषिकांनी मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्द बहाल केले आहे.महाराष्ट्राच्या मराठी भाषेला वैदर्भीय बोलीचं आरसपानी भाषिक लेणं चढवून तिला वैभव प्राप्त करून देण्यात विदर्भातील कविवर्य विठ्ठल वाघ यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या ‘तिफन’ कवितेनं त्यांना मराठी माणसांच्या घराघरात आणि त्याच पाठोपाठ माणसांच्या मनामनात पोहोचविलं आहे.मराठी भाषेच्या वैभवात आपल्या साहित्य कृतीनं ज्यांनी भर टाकली. त्या सर्वांच्या अग्रभागी असणा-या मोजक्या साहित्यिकांत कविवर्य विठ्ठल वाघ यांचं स्थान आहेत.

IMG 20200902 WA0034
प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
मो. 9422757523

आकोला जिल्ह्याचा तेल्हारा तालुक्यातील हिंगणी या खेड्यात कविवर्य विठ्ठल वाघांचा जन्म १ जानेवारी १९४५ रोजी झाला. मध्यप्रदेशातील इंदूर विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए ची पदवी १९६९ साली प्राप्त केली. १९८९ साली त्यांनी डॉ.मधुकर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पारंपारिक व-हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास ’या विषया मध्ये पी.एच.डी प्राप्त केली. आकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयात १९६९ ते १९९७ या कालावधीत मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. १९९७ ते २००४ याकालावधीत त्यंनी प्राचार्य म्हणून कामकाज पाहिले. या दरम्यान साय,वैदर्भी,काया मातीत मातीत,कापाशिची चंद्रफुले,पाऊस पाणी,गावशीव,पंढरीच्या वाटेवर,वृषभ सूक्त,मातीचा झरतो डोळा,मायबाप असे दहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले.’ डेबू ’आणि ‘डेबुजी’या दोन कादंब-या संत गाडगेबाबा यांच्या जीवना वर लिहिल्या.

व-हाडी म्हणी आणि लोकधर्म,व-हाडी इतिहास व बोली, पारंपारिक  व-हाडी म्हणी,व-हाडी म्हणी तील वाङमयीन  सौंदर्य,म्हणी कांचन हे संशोधनपर ग्रंथ लेखन त्यांनी केले. विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.

डॉ. वाघ यांच्या आवाजातील ही कविता

महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.

त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसेच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

साहित्यकृती

  • अरे संसार संसार {पटकथा/गीत लेखन) – या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
  • कपाशीची चंद्रफुले (कवितासंग्रह)
  • काज – दूरचित्रवाणी मालिका -पटकथा, संवाद लेखन
  • काया मातीत मातीत ((कवितासंग्रह) :या पुस्तकाला प्रियदर्शिनी पारितोषिक मिळाले होते.
  • गावशीव (कवितासंग्रह)
  • गोट्या – दूरचित्रवाणी मालिका -पटकथा, संवाद लेखन
  • डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावरील कादंबरी)
  • देवकीनंदन गोपाला (चित्रपट) – गीते, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
  • पंढरीच्या वाटेवर (कवितासंग्रह)
  • पाऊसपाणी ((कवितासंग्रह): या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.
  • पारंपरिक वऱ्हाडी म्हणी (संग्रह) (संशोधनात्मक लिखाण)
  • पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वागीण अभ्यास ((संशोधनात्मक लिखाण, पी‍एच.डी.चा प्रबंध)
  • पिप्पय (कवितासंग्रह)
  • म्हणी कांचन (रूपांतरे – ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणींत रूपांतर)
  • राघू मैना (चित्रपट) – पटकथा संवाद लेखन (भूमिका: नाना पाटेकर/मधू कांबीकर)
  • वऱ्हाड: इतिहास व बोली (संशोधनात्मक लिखाण)
  • वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक) (संशोधनात्मक लिखाण)
  • वऱ्हाडी म्हणींतील वाङ्‌मयीन सौंदर्य (संशोधनात्मक लिखाण)
  • वृषभ सूक्त (कवितासंग्रह)
  • शंभू महादेवाचा नवस (चित्रपट) – गीत लेखन
  • साय (कवितासंग्रह)

गाजलेली गीते

  • काळ्‍या मातीत मातीत तिफन चालते (चित्रपट – अरे संसार संसार)

सन्मान

  • पुण्याचे औंध साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • पहिल्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२८-११-२००७)
  • अकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष
  • अंबाजोगाई येथील बोली साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • २०१० सालचे मुखेड येथे झालेलेमायबोली साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • देहू येथे भरलेले २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • कारंजा-लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • सोळावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २००९, औरंगाबाद–संमेलनाध्यक्ष
  • २ मार्च २०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन – संमेलनाध्यक्ष
  • १३ जानेवारी २०११ला अकोट येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलनात ‘समकालीन ग्रामीण साहित्य: डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
  • सुलतानपूर येथे कविवर्य ना.घ. देशपांडे साहित्य नगरीत झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, ३ जानेवारी २०१०.
  • १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष
  • संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन (नागपूर) अध्यक्षपद, २५ फेब्रुवारी २०१३
  • अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई (२०१८) – अध्यक्षपद.

पुरस्कार

  • अरे संसार संसार’ या चित्रपटातील गीतलेखनासाठी पुरस्कार
  • कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि पत्नी प्रभा वाघ यांना यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार.
  • देवकीनंदन गोपाला या चित्रपटाच्या – गीत-पटकथा-संवादलेखन यांबद्दल पुरस्कार.
  • ’पाऊसपाणी’ या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार.
  • ’वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म’ या पुस्तकाला पुरस्कार.

डॉ. वाघ यांच्या आवाजातील ही कविता

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – भूतदया – कौटुंबिक संवाद

Next Post

माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित, सायंकाळी पक्षप्रवेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
20210108 094447 e1610091540857

माजी आमदार वसंत गीते, सुनील बागुल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित, सायंकाळी पक्षप्रवेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011