गर्भधारणा
गेल्या काही भागांपासून आपण वंध्यत्वाबाबतची माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण पुरुषांमधील दोष आणि उपचार पद्धतीविषयी जाणून घेतले. यापुढील काही भागात आपण स्त्रीयांमधील दोष आणि त्यासाठीच्या उपचार पद्धतीची माहिती आपण घेणार आहोत.

मो. 9822649544
ध्रुवं चतुर्णा सान्निध्यात गर्भ: स्यात् विधीपूर्वकम|
ऋतुक्षेत्राम्बुबिज़ानां सामग्यादंकुमरो यथा||
वंध्यत्व उपचार मध्ये पुरुषाची संपूर्ण तपासणी व चाचन्या नॉर्मल आल्यावर स्त्री रुग्णची तपासनी करावी असा मानक आहे. वयाच्या वीस ते पंचवीस वर्षाचा काळ हा स्त्रियांच्या विवाहास योग्य समजला जातो. कारण या नंतरच्या काळात गर्भधारणे ची शक्यता कमी होत जाते.
बालिका पूर्ण वाढ होऊन शारीरिक संपन्नता वयाच्या १६व्या वर्षानंतर प्राप्त होते. म्हणून पूर्वी मुलीचे हे वय विवाह योग्य समजला जात होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात उच्च शिक्षण, करिअर यामुळे लग्नास उशीर झालेला दिसतो. सरासरी तिसाव्या वर्षी विवाहानंतर अपत्यप्राप्तीसाठी जोडप्याची प्रयत्न सुरू होतात, असे व्यवहारात दिसते.
वंध्यत्वाची तपासणी करताना महिलेच्या शरीरात स्तन, गर्भाशय याची वाढ योग्य प्रमाणात झाली आहे का? तसेच गर्भाशयाचा आकार, योनीमार्ग, विशिष्ट अवयव यामध्ये काही दोष नसल्याची खात्री याबाबत तपासणी केली जाते. स्त्रियांमध्ये दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीबाबत माहिती घेऊन नियमित येणारी मासिक पाळी यावरून स्त्रीबीजाच्या कार्याची कल्पना आपणास येऊ शकते.
