फारसे उघडपणे न बोलण्याने आणि सतत विषय टाळून वंध्यत्वाविषयी अनेक गैरसमजच तयार झाले आहेत. ते दूर होणे आवश्यक आहे. वैद्यकशास्त्रात अनेक बाबी आहेत. त्या आपण समजून घेणे आवश्यक आहेत. भूतलावरच्या कोणत्याही पॅथी मध्ये नसणारा पण फक्त आयुर्वेद विचार “सौमनस्कत्व चिकित्सा” हमखास यश देते.
कामान्मिथुनसंयोगे शुद्धशोणितशुक्रज:
गर्भ : संजायते नार्या: संजातो बाल उच्यते॥
स्त्री-पुरुषांचा संयोग झाला असता स्त्रीचे आर्तव आणि पुरुषाचे शुक्र मिलन यापासून स्त्रियांस गर्भ उत्पन्न होतो. विवाहित जोडपे नैसर्गिकरित्या शरीर सहवास वर्षभर पूर्ण झाल्यावर गर्भधारणा होत नसल्यास त्यास प्राथमिक वंध्यत्व असे म्हटले जाते. मुल न होणे या गोष्टीला स्त्री इतकाच पुरुष जबाबदार असतो.
भारतीय परंपरेत वंशाचा दिवा लागल्यास जन्म सत्कारणी लागतो, असे मानले जाते. या उलट संतती नसणाऱ्या व्यक्तीला वाळवंटात एकाकी सापडलेले नि पर्ण वृक्षाची उपमा दिलेली आहे.
वंध्यात्वला कारण ठरणाऱ्या लक्षणांमध्ये साधारणतः ४० % जोडप्यात पुरुषांमध्ये दोष आढळून येतो. पुरुषाच्या तपासणीस कोणताही दोष आढळला नाही तर मग स्त्रीची तपासणी करणे योग्य ठरते.
स्त्रियांमध्ये वयाच्या वीस ते पंचवीस वर्षाचा काळ हा विवाहास व अपत्यप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यानंतरच्या काळात गर्भसंभव याची शक्यता कमी होते. अथवा इतर कारणांमुळे जन्मजात विकृती असणारे बालक जन्माला येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते, असे संशोधन सांगते.
स्त्रियांची तपासणी करताना विशिष्ट अवयव, स्तन, गर्भाशय इत्यादी प्रजनन अंगांची वाढ योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. गर्भाशयाचा आकार, योनीमार्ग शुद्ध असणे, बिजांड ग्रंथींची कार्यक्षमता याचा विचार करावा लागतो.
वंध्यत्वाचे उपचार करण्यापूर्वी गर्भाशय, गर्भाशयमुख, बीजवाहिन्या यामध्ये काही दोष आहेत का? गर्भाशय धारणस अनुकूल ऋतुकाळ, मासिक पाळीचा स्त्राव, स्त्रीबीज व पुरुष बीज प्राकृत असणे अत्यंत गरजेचे असते. याशिवाय उभयतांमध्ये गालगुंड, मलेरिया, गोवर, कांजण्या यासारखे उष्णतेचे विकार किंवा साथीचे आजार, ट्यूबरक्लोसिस, ऑपरेशन झालं असेल याचा इतिहास घेणे आवश्यक ठरतो.
महिलेलांची दर महिन्याला येणारी मासिक पाळी यावरून स्त्री बीजाची कार्यक्षमता कळते. गर्भधारणा कशी व कशामुळे होते याचा शास्त्रशुद्ध विचार करून त्यातील अडचणीचे निराकरण करणे आवश्यक असते. याच दृष्टीने वंध्यत्वाची कारणे शोधून त्यावर आयुर्वेदिक उपचार करणे योग्य आहे.
एखादी बीज अंकुरित होण्यासाठी योग्य हवामान, नैसर्गिक पुनरुत्पादन क्षमयुक्त जमीन, निरोगी पुनरुत्पादन करू शकणारे बीज व योग्य प्रमाणात वाढ होण्यास पाणी या सर्वांचा समतोल आवश्यक असतो. तेव्हाच उत्तम धान्य तयार होते. त्याचपद्धतीने निरोगी शरीरात नैसर्गिक मासिक पाळी, गर्भाशयाची शुद्धता, स्त्रीबीज व पुरुषबीज दोघेही सकस असावे.
दोघांचा नित्य आहार सेवन केल्यानंतर बीजाचे पोषण करणारा हा रस हे उत्तम असणे गरजेचे असते. यामध्ये काही उणीव अथवा दोष आढळल्या UNEXPLAINED INFERTILITY नावाचा प्रकार आढळतो.
भावीमातेच्या बीज कोशातून प्रत्येक मासिक पाळीच्या साधारणतः बारा ते अठरा दिवशी पूर्ण वाढ झालेले बीज बाहेर पडते. बीजनलिकेत स्त्री बीज सोबत शुक्रजंतूच्या संयोगाने तयार झालेला गर्भ पुढे काही दिवसानंतर गर्भाशयात उतरतो.
गर्भाशयात गर्भाची वाढ पूर्ण होते. म्हणूनच गर्भ राहण्यासाठी स्त्री जननेंद्रीय सर्व भाग निरोगी व कार्यक्षम असणे आवश्यक असते. अनावश्यक तपासणी फार आहारी न जाता रुग्णाची शारीरिक तपासणी करून त्याचं मनोबल वाढवून गरजेनुसार तपासण्या कराव्यात.
ज्या कारणांमुळे आपत्य, संतती जन्मास येण्यास अडथळा येतो, ती कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यावर योग्य ते उपचार घ्यावेत.
उपचारासाठी येणाऱ्या जोडप्यांमध्ये त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रानुसार कोणत्या दिवसात शरीरसंबंध ठेवल्यास अपत्य प्राप्तीची, गर्भधारणेची शक्यता असते याबाबत माहिती देणे गरजेचे असते.
मैथून आसनाचा वापर योग्य पद्धतीने समजून दिल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. भूतलावरच्या कोणत्याही पॅथी मध्ये नसणारा पण फक्त आयुर्वेद विचार “सौमनस्कत्व चिकित्सा” हमखास यश देते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!