बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण लाईव्ह विशेष – तरंग – चटका!

by Gautam Sancheti
सप्टेंबर 27, 2020 | 1:04 am
in इतर
0

चटका !

गेल्या काही दिवसात अनेक गुणी आणि सर्वसामान्यांच्या मनात घर करुन असलेल्या व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. प्रत्येकाचे वेगळेपण आणि त्यांच्याविषयीच्या सामान्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत. त्यांचे जाणे ही समाजाचीही मोठी हानी आहे.

IMG 20200829 WA0014

अशोक पानवलकर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

”असं प्रसन्न गोड माणूस इतकं तडकाफडकी नाहीसं कसं होऊ शकतं… दोन दिवस होऊन गेले तरी विश्वास बसत नाही..  आशालताबाईंना कधीही फोन केला की त्या फोन उचलला की म्हणायच्या… उमा, बोल बाळा कशी आहेस गं… त्यांना पहिल्यांदा फोन केला होता, तेव्हा एक किस्साच घडला होता.” किस्से रंगभूमीचे अशी एक मालिका आम्ही (आकाशवाणीवर) करत होतो. कलाकारांनी फक्त किस्से सांगायचे, तालमीत घडलेले आणि प्रत्यक्ष प्रयोगात घडलेले. ही मुलाखत मालिका होती. मी आशालता ताईंना फोन केला. त्या खुशीने येते म्हणाल्या. बऱ्याच वर्षांनी त्या आकाशवाणीत येत होत्या. आम्ही मग ध्वनिमुद्रणाची एक तारीख ठरवली. त्या म्हणाल्या, मी डायरीत लिहिते हं. आमचे ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण या मुलाखती घेत असत. मी लगेच सोमणांना फोन करून सांगितलं. पण ते त्या दिवशी रजेवर होते. आम्ही दुसऱ्या तारखेचा विचार केला. मी परत आशालता ताईंना फोन केला. नवीन तारीख त्यांना चालणार होती, त्यांनी परत डायरीत नोंद केली.
मात्र रद्द केलेल्या दिवशी सकाळी ११ वाजता  माझ्या मोबाईलवर त्यांचा फोन वाजला.  मी फोन घेतला, तर तिकडून त्या म्हणाल्या, उमा मी आलेय गं.. माझ्या लक्षात आलं की त्या विसरल्या. मी खाली गेले reception मध्ये. आमची ही पहिलीच भेट होती. बऱ्याच वर्षांनी त्या आकाशवाणीत येत होत्या. टॅक्सी करून आल्या होत्या. मी स्वागत करून म्हटलं, “पण आपलं पुढच्या आठवड्यात ठरलं होतं ना ” त्यांनी लगेच मान्य केलं” हो गं, मी विसरलेच की. मग आता काय करूया?” मी मनातून इतकी खट्टू झाले होते, कारण या मुलाखती सोमणांशिवाय कुणी घेतल्या नाहीत. ही लय आम्ही बिघडू दिली नव्हती. तरीही मी म्हटलं, “असू दे मी किंवा आणिक कुणी घेऊ मुलाखत. यावर त्या म्हणाल्या “पण ते तुझ्या मनासारखं नाही होणार ना”. मी म्हटलं ‘नाही’. त्या म्हणाल्या “मग मी परत जाते. निर्मातीच्या मनासारखं होणार नसेल तर ते काम करण्यात मला आनंद नाही”
मात्र पुढच्या आठवड्यात त्या परत आल्या ..
आणि मग येतच राहिल्या …
खुप मस्त झाली ही मुलाखत ….

वाबगावकर e1600759135804

आकाशवाणीत ज्येष्ठ अधिकारी उमा दीक्षित यांनी ही आठवण फेसबुकवर जागवली होती. त्यांनाच काय, आशालता बाईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आशालताबाईंच्या जाण्याने धक्का बसला. पण आशालता बाईंचे बरेचसे स्वभाव विशेष या किश्श्यात दिसल्याने तो इथे मुद्दाम दिला. आशालता बाईंचे गायन, अभिनय याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही हे खरे, परंतु अनेक वर्षे  त्यांचे गाणे, अभिनय कानात/डोळ्यात सगळेच साठून ठेवलेला एक प्रेक्षक/श्रोता म्हणून एखादा कलावंत आपल्याला आवडत असतो, आणि जगातून अचानक निघून जाऊन आपल्याला जबर धक्का देतो. आपण फक्त आठवणी जागवत बसतो. त्यांची गाणी गुणगुणत/ऐकत बसतो.

अर्थात २०२० या वर्षात असे अनेक धक्के बसलेत. या वर्षात आपण कोणाकोणाला गमावले याची यादी आठवायचा प्रयत्न केला तेव्हा काही नावे आठवली. क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, अभिनेते राजा मयेकर, गुणी गायक विनायक जोशी, स्वतःच्या लेखणीने वेगळे स्थान निर्माण करणारे उत्तम बंडू तुपे, पत्रकार /लेखिका मुक्ता राजाध्यक्ष, कसदार अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर, फुटबॉलपटू चुनी गोस्वामी अशी नावे आठवली. कसदार लेखक रत्नाकर मतकरी, बेजान दारुवाला, शायर राहत इंदोरी, ज्येष्ठ अभिनेते  चंद्रकांत मेहेंदळे, जाणते दिग्दर्शक  बासू चॅटर्जी, शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या प्रा. लीलाताई पाटील,  बुजुर्ग पत्रकार दिनू रणदिवे,  अक्षरसम्राट कमल शेडगे, सनदी अधिकारी आणि त्याहीपेक्षा उत्तम माणूस /लेखिका म्हणून नीला सत्यनारायण, बेरके राजकारणी अमर सिंग, वर्तमानपत्राच्या क्षेत्रात नाव मिळवलेले मुरलीधर शिंगोटे, स्वामी अग्निवेश, क्रिकेटपटू चेतन चौहान, दिग्दर्शक निशिकांत कामत, संगीतसूर्य पंडित जसराज, राष्ट्रपती पदाची शान उंचावणारे प्रणव मुखर्जी, गायिका/अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि परवा शुक्रवारी स्वतःच्या खास गायकीने ठसा उमटवणारे आणि जवळपास ४० हजार गाण्यांचे गायक  एस पी बालसुब्रमण्यम… (ही यादी सर्वसमावेशक नाही)

NPIC 202091152857

यातील प्रत्येकाचे समाजातले योगदान वेगवेगळ्या क्षेत्रातले. तुलनेने कमी-अधिक उंचीचे. परंतु यातला प्रत्येक माणूस गेल्यावर आपण हळहळलो हे मात्र खरे. याचे कारण यातील प्रत्येक माणसाने सामान्य माणसाच्या आयुष्याला कमी-अधिक प्रमाणात स्पर्श केला होता. एस पी बालसुब्रमण्यम हे दाक्षिणात्य गायक असले तरी त्यांचा विशिष्ट हेल काढून गायलेली हिंदी गाणी कायम मनात ठसली. खरे म्हणजे मुकेश, किशोरकुमार, मोहम्मद रफी यांनी हिंदी गीतांवर साम्राज्य केले खरे, पण एसपी यांनी तेलगू, तामिळ, कन्नड या भाषेतील गाण्यांप्रमाणेच हिंदी गाण्यांबाबतही स्वतःचा खास वेगळा ठसा उमटवलाच. म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येक संगीत रसिक व्यथित झाला. त्याला भाषेचे बंधन नसते. किंबहुना संगीत हा असा प्रकार आहे की जो सर्व जात/पंथ /भाषिक याना एकत्र आणते. एसपींचे गाणे असे होते.

यातील काहींचे जाणे नैसर्गिक असले तरी काहींचा बळी कोरोनाने घेतला. एखादा सामान्य माणूस असो, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असोत, एखादा वैज्ञानिक असो अथवा एखादा पत्रकार असो, कोरोनाने मृत्यू होणे नैसर्गिक मृत्यूइतकेच काळजाला चटका लावून जाते. किंबहुना जरा जास्तच! कितीतरी गुणी माणसे या कोरोनाने आपल्यातून हिरावून नेली. आणखी कोणी जाऊ नये एवढीच अपेक्षा आपण करू शकतो.

मोठ्या माणसांचे जाणे असेल तर भरपूर प्रसिद्धी मिळते. ती रास्त असली तरी अनेक जण त्या प्रसिद्धीपासून दूरही राहतात. त्यांचे सामान्यत्व असामान्य असले तरी. मला इथे आठवल्या त्या गेल्याच आठवड्यात निधन पावलेल्या ८८ वर्षीय श्रीमती इंदिरा व्यंकटेश कामत. सुप्रसिद्ध उद्योगपती डॉ. विठ्ठल कामत यांच्या आई. त्या त्यांच्या आई होत्या म्हणून सांगत नाही. त्या लग्नानंतर काही काळ जशा हलाखीचे आयुष्य जगल्या, तशीच मुलाने, नातवाने मिळवलेले उत्तुंग यशही त्यांनी पाहिले. आज डॉ. कामत अनेकांचे प्रेरणास्थान असले तरी कामत कुटुंबियांचे प्रेरणास्थान त्या होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना विस्मरणाचा आजार झाला. डॉ विठ्ठल कामत, त्यांचे कुटुंबीय आणि स्वतः त्या यांनी त्याच्याशी कसा सामना केला हे ज्यांना माहीत आहे त्यांनाच त्यांचे महत्व कळेल. या वयात विस्मरणाच्या आजारातून बाहेर येण्याची उदाहरणे कमी आहेत, पण त्या त्यातून बऱ्यापैकी बाहेर आल्या हे कौतुकास्पद होते. त्यांच्याबद्दल पुस्तकातून, टीव्हीवर बरेच काही ऐकायला, वाचायला मिळाले, अलीकडच्या काळात त्यांना एकदा भेटताही आले. अवघ्या पंधरावीस मिनिटांची भेट असेल, पण त्यांच्यातली जगण्याची आणि तेही आनंदाने जगण्याची वृत्ती पाहून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते हेच खरे. त्यामुळे त्या गेल्याचा मेसेज आला तोही अरेरे, असे नकळत म्हणून गेला.

कोणत्याही क्षेत्रातील कोणताही माणूस किती उंचावर गेला यापेक्षा कसा उंचावर गेला हे महत्वाचे असते. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक माणसाने ही वेगवेगळी उंची गाठली. ती गाठताना त्यांना सगळेच सहजप्राप्त झाले असे नाही. त्यासाठी घेतलेल्या कष्टांचे चीज झाले. त्यांच्या जाण्याने प्रत्येक सुजाण माणूस हळहळला .

आपण दुसरे काय करू शकतो?

प्रख्यात व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी व्यंगचित्रातून एस पी बालसुब्रमण्यन यांना वाहिलेली ही श्रद्धांजली
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थोर भारतीय गणिती – भाग ३ – शकुंतला देवी

Next Post

आजचे राशीभविष्य – रविवार – २७ सप्टेंबर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

राज्यात या भागात आजपासून पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250903 WA0339
महत्त्वाच्या बातम्या

रिलायन्स जिओला ९ वर्ष पूर्ण…५० कोटी ग्राहकांना दिली ही खास सेलिब्रेशन प्लॅनची भेट

सप्टेंबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या, गुरुवार, ४ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 3, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

पावसाळा संपताच कुंभमेळ्याची विकास कामे सुरू होणार…नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा

सप्टेंबर 3, 2025
notice
मुख्य बातमी

महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना बजावली नोटीस…हे आहे कारण

सप्टेंबर 3, 2025
Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या

आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती

सप्टेंबर 3, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

या मार्गावर सुरू होणार रेल्वे…असा असेल रेल्वे मार्ग

सप्टेंबर 3, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा चार लाख रूपयाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 3, 2025
Next Post

आजचे राशीभविष्य - रविवार - २७ सप्टेंबर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011